मालेगाव : (Malegaon) तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे गटाचे (Eknath Shinde) पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी वर्चस्व राखले, मतदारसंघातील ७ पैकी ५ ग्रामपंचायतींवर भुसे समर्थकांनी बाजी मारली. (Grampanchayat Elections proven Dada Bhuse in his own Constituency)
ही निवडणूक दादा भुसे व त्यांच्या विरोधकांसाठी प्रतिष्ठेची होती. त्यात मोठे थेट निवडणुकीत उतरले नाहीत. मात्र त्यांच्या समर्थकांना त्यांनी पाठबळ दिले होते. या निवडणुकीत दाभाडी, पाटणे, सौंदाणे, वजीरखेडे या चार मोठ्या तसेच मोहपाडे अशा ५ ग्रामपंचायतींमध्ये बाळासाहेबांची शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व आले. करंजगव्हाण ग्रामपंचायतीत ७ सदस्य मोठ्या फरकाने विजयी झाले.
तालुक्यातील १३ पैकी ९ ग्रामपंचायतींमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्वाधिक सदस्य निवडून आले. मालेगाव बाह्य मतदार संघातील ७ पैकी ५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी भुसे समर्थक विजयी झाले. नांदगांव विधानसभा मतदार संघातील ६ पैकी ४ ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांची शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील एकूण ७ ग्रामपंचायतींमधील ९६ जागांपैकी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे ५ सरपंच व ६९ ग्रामपंचायत सदस्य विजयी झाले. अनेक गावांमध्ये भुसे समर्थकांनी सत्ता कायम ठेवली आहे. बाळासाहेबांची शिवसेनेच्या सर्व विजयी व बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांनी श्री. भुसे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर जल्लोष केला. सर्व विजयी सरपंच व सदस्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय दुसाने, युवासेना विस्तारक, उत्तर महाराष्ट्र अविष्कार भुसे, उपजिल्हाप्रमुख सुनील देवरे, प्रमोद पाटील, तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव, महानगरप्रमुख विनोद वाघ, माजी उपमहापौर नीलेश आहेर, सखाराम घोडके, प्रकाश आहिरे, सुनील चांगरे, यशपाल बागूल, किरण पाटील, देवा वाघ, गोकूळ सूर्यवंशी आदींसह बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री दादा भुसे यांच्या माध्यमातून तालुक्यात होत असलेली विकासकामे व जनसामान्यांच्या कामांसाठी पदाधिकारी व कार्यकर्ते घेत असलेल्या परिश्रमाचे हे यश असल्याचे जिल्हाप्रमुख संजय दुसाने यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.