Ahilyanagar News: महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत महायुतीसाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती. मात्र,सरकारकडून केवायसी अपडेट व तांत्रिक चुकांच्या नावाखाली अनेक महिलांना अपात्र ठरवले गेले आहे. त्यांचं अनुदान बंद करण्यात आलं आहे. अपात्र महिलांची संख्याही 80 ते 92 लाखांवर पोहोचली आहे.
मात्र, आता ई-केवायसी आणि तांत्रिक त्रुटींमुळे अपात्र ठरवलेल्या महिलांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. तसेच हा मुद्दा निकाली तात्काळ निकाली काढला नाही,तर 26 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानाबाहेर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.
जनवादी महिला संघटना आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली महिलांनी गुरुवारी(ता.15)अकोले तहसील कार्यालयावर मोर्चा काढत आक्रमक पवित्रा घेतला आहे. हा मोर्चा किसान सभेच्या अजित नवलेंच्या नेतृत्वात काढण्यात आला. या मोर्चामध्ये आदिवासी, गरीब, गृहिणी, मोलमजुरी, कष्टकरी महिलांचा समावेश होता.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील आमचं 1500 रुपयांचं अनुदान बंद झाल्याचा गंभीर आरोप मोर्चातील आंदोलक महिलांनी केला आहे. यावेळी महिलांनी जर सरकारनं या बंद झालेल्या हप्त्यांचा प्रश्न तातडीनं मार्गी लावला नाही, तर थेट मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानाबाहेर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातील केवायसी प्रकिया पुन्हा सुरू करून अपात्र ठरलेल्या महिलांना योजनेचा लाभ द्या,अशी मागणी संबंधित आंदोलक महिलांकडून करण्यात आली आहे. या सर्व महिलांनी आम्हांला दिवाळीपूर्वी योजनेचा लाभ मिळण्यात यावा अशी मागणी उचलून धरली आहे. विशेष म्हणजे या महिलांनी निवडणुकांच्या प्रचारावेळी 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याच्या घोषणेची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी असंही म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.