ST Strike: ऐनदिवाळीतच फडणवीस सरकारसमोर मोठं संकट? 'एसटी' कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा? भाजप आमदार पडळकरांची भूमिका आली समोर

Mahayuti Government: ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यातील फडणवीस सरकारसमोर एक नवं संकट उभं ठाकण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाचे कर्मचारी पुन्हा एकदा ऐन दिवाळीच्या तोंडावर संप पुकारण्याच्या तयारीत आहे.
ST Employee Protest
ST Employee ProtestSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News: ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यातील फडणवीस सरकारसमोर एक नवं संकट उभं ठाकण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाचे कर्मचारी पुन्हा एकदा ऐन दिवाळीच्या तोंडावर संप पुकारण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) महिला सन्मान योजना आणि ज्येष्ठ नागरिक प्रवास सवलत या लोकप्रिय योजनांमुळे गेल्या काही वर्षांपासून एसटी पुन्हा एकदा सर्वसामान्य प्रवाशांसाठी जीवनवाहिनी ठरते आहे.

राज्यभरातील एसटी कर्मचारी येत्या 6 नोव्हेंबर 2026 पासून राज्यव्यापी संप पुकारण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदनपर पत्र दिलं आहे. या मागण्या पूर्ण करण्यासाठी 6 नोव्हेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

राज्य सरकारकडून जर संबंधित मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर त्यादिवसापासून राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर जाणार असल्याचा इशारा दिला आहे. जर दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तर त्याचा मोठा फटका दिवाळीत घरी जाणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे.

एसटी कर्मचार्‍यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात दर महिन्याच्या 7 तारखेला पगार, 60 टक्के महागाई भत्ता तसेच दिवाळीला 15 हजार रुपयांचा बोनस, यांसारख्या मागण्यांचा समावेश आहे. एकूण 17 प्रलंबित मागण्यांसाठी ही नोटीस देण्यात आली. या सर्व मागण्यांसाठी 'सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने संप पुकारण्याचा इशारा दिला आहे.

ST Employee Protest
Sushma Andhare News: 'अभ्यासाच्या अभावामुळेच कदाचित सुषमाताईंवर बेरोजगार राहण्याची वेळ...' ; भाजप आमदार विक्रम पाचपुतेंनी अंधारेंना डिवचलं

भाजप आमदार गोपीचंद पडळकर या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. तसेच त्यांनी सरकारसोबतच्या बैठकांमध्ये निर्णय झाल्यानंतरही मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्याचा हल्लाबोल पडळकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर केला आहे.

'सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघासह एसटीशी निगडित विविध संघटना या राज्यव्यापी संपात सहभागी होण्याची शक्यता आहे. भाजपच्या आमदारानं थेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे असलेल्या व परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांवर आरोप आणि संपाचा इशारा यामुळे सत्ताधारी महायुतीतीलच राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. तसेच सरनाईक या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर कसा तोडगा काढतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ST Employee Protest
Jayant Patil Meet CM : मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीवर जयंत पाटलांचे भाष्य : ‘फडणवीसांसोबत भेट अन्‌ चर्चाही झाली; काही वेगळे प्रश्न असतात...’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com