Gulabrao Patil : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून महायुतीतील तिन्ही पक्षांनी अनेकदा लाडकी बहीण योजना आपलीच असा दावा केला. या योजनेचा निवडणुकीत महायुतीला चांगला फायदा झाला. मात्र, महायुतीमध्ये या योजनेवरून सुरू असलेली श्रेय वादाची लढाई आजूनही संपलेली दिसत नाही. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी या योजनेवरुन आता नवीन दावा केला आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे एकनाथ शिंदे यांनी सुरू केले, असे सभासद नोंदणी करताना महिलांना सांगा असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. आपला दाढीवाला बाबा म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लाडक्या बहिणींना 1500 रुपये देतात असा गुलाबराव पाटील यांचा दावा आहे. जळगावमधील मेळाव्यात त्यांनी या योजनेचे श्रेय शिवसेनेचे अर्थात एकनाथ शिंदे यांचे असल्याचा एक प्रकारे दावा केला आहे.
जळगावच्या मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्ते पदाधिकार्यांना त्यांनी सभासद नोंदणीचे आवाहन करताना हा दावा केला. ते म्हणाले, सभासद नोंदणी करताना एवढेच सांगा की, ज्या एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजनेचे पैसै चालू केले त्या एकनाथ शिंदे यांचा हा पक्ष आहे. असा सल्ला त्यांनी पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिला. तसेच पुरुषांपेक्षा महिलांनी ठरवलं तर महिला आघाडीची नोंदणी पुरुषांपेक्षा जास्त होऊ शकते असही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या वेळेस मी निवडून येणार नाही अशा अफवा लोकांनी पसरवल्या. इंग्रजांच्या काळात जसं एक अफवा पसरवणारं खातं होतं तसचं काहीसं लोकांनी केलं. गुलाबराव पाटलाचं काही खरं नाही, मराठा बौद्ध मुस्लिम समाज मला मतदान करणार नाही अशा अफवा पसरवण्यात आल्या होत्या, असं पाटील म्हणाले.
या अफवांमुळे मला रात्र-रात्रभर झोप लागत नव्हती. बायकोने जरी हात लावला तरी मी उठून तिला नमस्कार करायचो की लक्ष ठेवजो असा किस्सा पाटलांनी सांगताच यावेळी एकच हाश्या पिकला. मी निवडून आल्यानंतर लोकांनी प्रचार केला की निवडणुकीत गुलाबराव पाटलांनी अमाप पैसा वाटला. पण प्रत्यक्षात तसे नसते तुमचं काम महत्वाचं असतं. माझ्याकडे कुठला समाज नाहीये मात्र सर्व समाजाच्या लोकांनी जवळपास 45 टक्के मतदान करून हे सिद्ध करून दिलं की कामाच्या पुढे समाज चालत नाही. जो काम करेगा वही मेरा समाज आहे असं ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.