Girish Mahajan : जळगाव जिल्ह्यात भाजपमध्ये महाजन सांगतील तीच पूर्व दिशा

Girish Mahajan’s Dominance in Jalgaon BJP : जळगाव जिल्ह्यात सध्या गिरीश महाजन सांगतील तीच पूर्व दिशा आहे. नवनिर्वाचित दोन्ही जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्ष हे गिरीश महाजन यांच्याच मर्जीतील आहेत.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने जळगाव जिल्ह्यात भाजपने कंबर कसली आहे. त्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात भाजपने दोन जिल्हाध्यक्ष व एक महानगराध्यक्षाची निवड केली आहे. जळगाव जिल्ह्यातील भाजपची ही नवी टीम जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विश्वासातील असून त्यांच्यावर महाजनांचे पूर्णपणे वर्चस्व असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

जळगाव जिल्ह्यात सध्या गिरीश महाजन सांगतील तीच पूर्व दिशा आहे. नवनिर्वाचित दोन्ही जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्ष हे गिरीश महाजन यांच्याच मर्जीतील आहेत. महाजनांच्या सांगण्यावरुन पक्षाने त्यांची निवड केली आहे. इतर पक्षात गटातटाचे राजकारण सूरु असताना जळगावात मात्र महाजन सांगतील तोच सूर आणि तीच ताल अशा पद्धतीचे चित्र आहे.

Girish Mahajan
Neelam Gorhe On Sanjay Raut : 'राऊतांनी पुस्तकाचं श्रेय स्वप्ना पाटकरांना द्यावं'; नीलम गोऱ्हेंनी वर्मावरच घाव घातला

एकेकाळी जिल्ह्यात भाजपचे वरिष्ठ नेतृत्व म्हणून एकनाथ खडसे यांच्याकडे बघितले जाते. खडसे यांचा जिल्ह्याच्या राजकारणात मोठा दबदबा होता. पण राजकीय स्पर्धेतून खडसेंना भाजप सोडावी लागली. खडसेंनी अनेकदा भाजप प्रवेशासाठी प्रयत्न केले पण आजून त्यांना त्यात यश आलेलं नाही. कोणत्या न् कोणत्या कारणाने त्यांचा भाजप प्रवेश रखडला. त्यानंतर जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर आता गिरीश महाजन यांचा वरचष्मा बघायला मिळत आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या निर्णय प्रक्रियेवरही त्यांचा ठसा स्पष्टपणे जाणवू लागला आहे.

विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकांचे नेतृत्वही गिरीश महाजन यांनीच केले. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर जबाबदारी दिली होती. महाजन यांनीही पक्षाला लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मोठे यश संपादित करुन दिलं. लोकसभेला वारं महाविकास आघाडीकडे असतानाही जळगावात मात्र महाजन यांच्या नेतृत्वात भाजपने आपला बालेकिल्ला राखला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धुराही त्यांच्याच खांद्यावर आहे. त्यादृष्टीने त्यांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती स्वतंत्र लढेल की महायुती म्हणून याबाबत अजून निर्णय झालेला नाही. मात्र इच्छुकांची संख्या अधिक असल्याने निवडणुका स्वतंत्र लढण्याची वेळ येऊ शकते. हे लक्षात घेऊन महाजन यांनी भाजपमध्ये कार्यक्षम आणि जनतेत चांगली प्रतिमा असलेले नवे चेहरे पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे.

Girish Mahajan
Anjali Damania : बीडमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवा, अंजली दमानियांच्या मागणीने खळबळ

जळगाव पूर्व विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी जामनेरचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांची निवड करण्यात आली आहे. ते गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असल्यानेच त्यांना संधी मिळाली आहे. तर जळगाव पश्चिम विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, महानगर अध्यक्षपदी दीपक सूर्यवंशी यांची निवडही महाजनांच्या मर्जीतूनच झाली आहे.

भाजपला विशेषतः रावेर लोकसभा मतदारसंघात मराठा चेहरा देण्यासाठी पूर्व जिल्हाध्यक्षपदी त्यांनी चंद्रकांत बाविस्कर यांची निवड केली. तर जळगाव महापालिकेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महानगर जिल्हाध्यक्षपदासाठी दीपक सूर्यवंशी यांना संधी दिली. याशिवाय, जळगाव लोकसभा मतदारसंघातील गुर्जर समाजाची सहानुभूती मिळविण्यासाठी डॉ. राधेश्याम चौधरी यांची पश्चिम विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी वर्णी लावली. तीन्ही जिल्हाध्यक्षांची निवड महाजन यांनी आपल्या पसंतीनुसारच केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com