Maharashtra Politics : मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना प्रा. नामदेव जाधव यांनी शरद पवार यांच्यावर जहरी भाषेत टीका केल्याचा आरोप होत आहे. शरद पवार दिल्लीत मराठा म्हणून मिरवतात, तर महाराष्ट्रात मराठ्यांची जिरवतात, अशी टीका प्रा. जाधव यांनी केली आहे. प्रा. जाधव हे माँ जिजाऊ यांचे वंशज असल्याचा उल्लेख करतात. त्यांच्या वक्तव्यांचा आणि दाव्यांचा खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी खरपूस समाचार घेतलेला आहे. याबाबत आता राजे लखोजीराव जाधवांच्या सिंदखेडराजा येथील वंशजांनी प्रा. नामदेव जाधव यांच्यावर कायदेशीर कारवाईसह गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांच्याकडे केली आहे.
दिवाळी दौऱ्यानिमित्ताने सिंदखेडराजामध्ये असताना लखोजी राजेंच्या वंशजांनी निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केल्याचे रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.
नामदेव जाधव नावाची व्यक्ती सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचे वंशज म्हणवून घेत आहे. मात्र, त्यांचा राजे लखोजीराव जाधव आणि जिजाऊ माँ साहेब यांच्या घराण्याशी कोणताही संबंध नसून ती व्यक्ती केवळ प्रसिद्धीसाठी आदरणीय पवार साहेबांवर टीका करत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
याबाबत चौकशी करून त्यांची तोतयेगिरी उघडकीस आणण्याची मागणी स्वराज्य संकल्पक महाराजा राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज प्रा. राजे गोपाल भगवानराव जाधव यांनी केली. स्वतःच्या फायद्यासाठी कुणी असं करत असेल तर हे चुकीचं असून, याची चौकशी झाली पाहिजे, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
प्रा. नामदेव जाधव हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या विविध आरोपांमुळे वादात सापडले आहेत. जाधव यांनी आपण राजमाता जिजाऊ आणि राजे लखोजीराव जाधवांचे आपण वंशज असल्याचे म्हटल्याने त्यांच्या या दाव्यावर राजे जाधव यांच्या मूळ वंशजांनी आक्षेप घेतला आहे. प्रा. नामदेव जाधव हे तोतया वंशज असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी रोहित पवार यांच्याकडे केली आहे.
सिंदखेडराजा इथल्या 'स्वराज्य संकल्पक महाराजा राजे लखोजीराव जाधव संस्थे'चे प्रमुख आणि राजे लखोजीराव जाधवांचे मूळ वंशज राजे गोपाळ भगवानराव जाधव यांनी प्रा. नामदेव जाधव यांच्या वंशज असल्याच्या दाव्यावर आणि शरद पवार यांच्यावर केलेल्या टीका-टिप्पणीवर आक्षेप घेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
रोहित पवार सध्या दिवाळीनिमित्त दौऱ्यावर आहे. सिंदखेडराजा इथे राजे लखोजीराव जाधवांचे मूळ वंशज प्रा. राजे गोपाळ जाधव यांनी रोहित पवार यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी प्रा. नामदेव जाधव हे तोतया जिजाऊंचे वंशज असल्याचा आरोप केला आहे. नामदेव जाधव हे लाखोजीराजे यांचे वंशज म्हणून फिरत असून, केवळ जाधव आडनावाचा ते गैरफायदा घेत असल्याचे म्हटले आहे. त्यांचा मूळ घराण्याशी कुठलाही संबंध नसून सोयरे-संबंध आणि वंशावळीत संबंध नसल्याचा नाही. केवळ प्रसिद्धीसाठी वंशज सांगून ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आरोप करत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सिंदखेडराजा येथील सर्व मूळ राजे लखोजीराव जाधव यांच्या वंशजांनी नामदेव जाधव यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
प्रा. नामदेव जाधव यांची कायदेशीर चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच त्यांची फसवेगिरी उघड करावी, फसवणूक अपप्रचार केला, बदनामी केली म्हणून गुन्हा दाखल व्हावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज प्रा. गोपाळ जाधव, सुभाष जाधव, मार्तंडराव जाधव यांच्या सह्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.