Lalit Patil Case Update : Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Lalit Patil Case Update : सचिन वाघला घेऊन पोलिसांची पुन्हा गिरणा नदी किनारी ड्रग्ज शोध मोहीम!

Lalit Patil Case Update : पोलिसांकडून नाशिकमध्ये सर्च ऑपरेशन

Chetan Zadpe

Lalit Patil Case Update : पोलिसांच्या अटकेत असलेला ड्रग्स माफिया प्रकरणामध्ये रोज धक्कादायक आणि नवनवी माहिती समोर येत आहे. ललितच्या पाटील याच्या खासगी चालक सचिन वाघ नदीच्या पात्रामध्ये ड्रग्ज फेकले होते, त्याचा कसून शोध घेतला जात आहे. मागील पाच दिवसांपासून ललित पाटील याच्याकडील ड्रग्सचा साठा शोधण्यासाठी पोलिसांकडून नाशिकमध्ये ऑपरेशन राबवले होते. आता याचा पुन्हा तपास केला जात आहे. (Latest Marathi News)

ललित पाटील याचा वाहनचालक सचिन वाघ याला पुन्हा नाशिकच्या लोहनर ठेंगोडा येथे गिरणा नदीपात्रात पोलीस घेऊन आले आहेत. आता पुन्हा एकदा ड्रग्स शोध मोहीम पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या टीमने ४ तास स्कुबा डायव्हरच्या मदतीने अंडर वॉटर सर्च ऑपरेशन केले होते. आता पुन्हा साठा शोधण्यासाठी मुंबई पोलिसांची टीम नाशिकमध्ये आली आहे.

ललित पाटील प्रकरणात आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. ललित पाटील याच्या चालकाने नदी पात्रात फेकलेले ड्रग्स शोधून काढले जात आहे. पाच दिवसांपासून ड्रग्ससाठा शोधण्यासाठी मुंबई पोलिसांच्या टीमने नाशिकमध्ये ऑपरेशन राबवले होते. नाशिक जिल्ह्यातील लोहनेर ठेंगोडा येथे असलेल्या गिरणा नदीत फेकलेला कोट्यावधी रुपयांचा ड्रग्सचा साठा शोधण्याचा प्रयत्न केला होता. मुंबई पोलिसांची एक टीम एक स्थानिक पथकाच्या मदतीने पाण्याच्या खाली शोध घेत आहे."

सध्या ललित पाटील आणि सचिन वाघ पोलिस कोठडीत आहेत. ललित पाटील याला ससून रुग्णालयातून पळून जाण्यात सहकारी चालक सचिन वाघ याने मदत केली होती. ललित पाटीलच्या सांगण्यावरून सचिन वाघ याने ड्रग्ज लपवून ठेवल्याचा किंवा त्याची विल्हेवाट लावल्याचा पोलिसांना संशय आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT