BJP Political News : प्रचंड राजकीय गदारोळानंतर अखेर भाजपकडून 'ते' ट्विट डिलीट; महायुतीत नेमकं चाललंय तरी काय ?

Devendra Fadnavis Political News : महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खुर्ची जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे....
Devendra Fadnavis -Bjp
Devendra Fadnavis -BjpSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राजकीय घडामोडींनी वेग पकडला आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तडकाफडकी दिल्ली दौरा केला होता. या दौऱ्यात शिंदे-फडणवीसांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर खलबतं झाल्याचं बोललं जात आहे. याचवेळी महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला होता.

या व्हिडिआेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईनचा नारा देताना दिसून येत आहेत. या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. तसेच राजकीय भूकंपाचे संकेतही दिले जात होते. पण या ट्विटमुळे महायुतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे अखेर भाजपकडून संबंधित ट्विट डिलीट करण्यात आले आहे. एक तासांहून अधिक काळ असलेले हे ट्विट डिलीट करण्यात आले.

Devendra Fadnavis -Bjp
Devendra Fadnavis News : फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? भाजपने व्हिडिओ केला ट्विट; राजकीय भूकंप होणार?

राज्यात काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना वेग घेतला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खुर्ची जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. अशातच भाजपकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2019 च्या निवडणुकीआधी त्यांनी विधानसभेत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ‘मी पुन्हा येईन’, अशी कविता म्हटली होती. त्याच घटनेचा व्हिडीओ भाजपकडून ट्विट करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा मोठा भूकंप घडणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.(BJP Politics)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच दिल्ली दौऱ्यावर जावून आले आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काल शिर्डी दौऱ्यावर आले होते. त्यानंतर आता भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईन बोलतानाचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांपूर्वीच दिल्ली दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यावेळी दिल्लीत गुप्त बैठक झाली होती. या बैठकीचे तपशील समोर येऊ शकले नव्हते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर आले होते. त्यानंतर भाजपकडून हे ट्विट करण्यात आलंय. त्यामुळे भाजपला या ट्विटच्या माध्यमातून नेमकं काय म्हणायचं आहे? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय.

ट्विटमध्ये नेमकं काय होतं...?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वीच दिल्ली वारी झाली. आता आज महाराष्ट्र भाजपने अधिकृत ट्विटर हँडलवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन... या शीर्षकाखाली हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis -Bjp
Maratha Reservation : मराठा आरक्षणास पाठिंब्यासाठी चांदवडला मुस्लीम समाजही उतरला रस्त्यावर

मी पुन्हा येईन... नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, मी पुन्हा येईन... गावांना जलयुक्त करण्यासाठी, मी पुन्हा येईन... शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी..., असं देवेंद्र फडणवीस या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत. ३१ सेकंदांचा हा व्हिडिओ आहे. आणि आता या व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना एकच उधाण आलं आहे.

प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले होते...?

भाजप नेते प्रसाद लाड यांनी या व्हिडीओवर ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. पक्षाचा एक कार्यकर्ता, पदाधिकारी आणि आमदार म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तर मला निश्चितच आवडेल. आम्ही त्याचं स्वागत करू, अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिलीय. भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय. त्यामुळे आम्हाला स्वागतच करावं लागेल आणि आनंदसुद्धा होईल, असं प्रसाद लाड म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Devendra Fadnavis -Bjp
Administration - Politics : प्रशासकीय अधिकारी राजकारणात,अनेकजण तरले,काहीजण फसले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com