Balasaheb Kshirsagar & Suspended Traders of Niphad Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Lasalgaon APMC Politics : शेतकऱ्याला धमकावणाऱ्या व्यापाऱ्याचा परवाना तासाभरातच निलंबित!

Niphad Farmer Politics : शेतकऱ्यांच्या दबावामुळे लासलगाव बाजार समितीतील शेतकऱ्याचा परवाना सभापतींनी निलंबित केला

Sampat Devgire

Farmers Politics : काळ बदलला, शेतकरी शहाणा होऊ लागला याची प्रचिती देणारा प्रसंग नुकताच भारतातील सर्वात मोठ्या कांदा उलाढाल होणाऱ्या लासलगाव बाजार समितीत घडला. येथे शेतकऱ्याला मालाचे पैसे न देता धमकावणाऱ्या व्यापाऱ्याचा परवाना तडकाफडकी निलंबित करण्यात आला. (Chairmen Balasaheb Kshirsagar takes a serious decision in Favour of Farmers)

लासलगाव बाजार समितीच्या (Cooperative) निफाड (Niphad) उपबाजारात सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांबाबत (Farmers) हा प्रकार घडला. त्यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी हा निर्णय घेतला.

काय करायची ती तक्रार करा

मंगळवारी या शेतकऱ्याने निफाड उपबाजारात सोयाबीन विक्री केली. त्याचे पैसे घेण्यासाठी हा तरुण शेतकरी व्यापारी संजय चोरडीया यांच्या दुकानावर गेला. या वेळी त्याला अतिशय अवमानास्पद वागणूक देण्यात आली. व्यापाऱ्याने पैसे देत नाही, बाजार समितीत जा, काय करायची ती तक्रार कर अशी दुरुत्तरे केली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर खळबळ उडाली.

या वेळी संबंधित शेतकऱ्यांबरोबर असलेल्या सहकाऱ्याने त्याचा व्हिडिओ चित्रित केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर शेतकऱ्यांनी बाजार समितीत तक्रार केली. व्यापाऱ्याला फोन करून जाब विचारला. त्यावेळी हा व्यापारी जमिनीवर आला, त्याने माफी मागितली. मात्र, शेतकऱ्यांनी त्याला दाद दिली नाही. जवळपास दोनशेहून अधिक शेतकरी बाजार समितीच्या सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांना भेटले. त्यांनी त्याची दखल घेत, तातडीने व्यापाऱ्याचा परवाना निलंबित केला. गेल्या काही वर्षांत व्यापाऱ्याबाबत एवढा कडक निर्णय पहिल्यांदाच झाल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी जागरूक होऊ लागल्याची ही चिन्हे आहेत. यापूर्वी एवढा तडकाफडकी असा गंभीर निर्णय झालेला नाही. शेतकरी राजकीयदृष्ट्या जागरूक झाल्याने हे घडले. व्यापारी बराच गयावया करीत होता. मात्र, त्याला दाद न देता आमच्या अधिकारात आम्ही ही कारवाई केल्याचे सभापती व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT