Maratha Reservation Protest : भुजबळांच्या मतदारसंघात प्रत्येक मोठ्या गावात होणार उपोषण!

Maratha Reservation Row : येवला येथील सकल मराठा समाजाच्या बैठकीत आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Yeola Maratha Politics : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्याकडून चाळीस दिवसांची मुदत घेतली होती. मात्र, ती मुदत संपल्यावरदेखील राज्य सरकार चालढकल करीत असल्याने फसवणूक झाल्याची भावना मराठा समाजामध्ये निर्माण झाली आहे. ( Maratha community feels unhappy about non compliance of reservation deemand)

आरक्षणाची (Maratha reservation) मागणी राज्य सरकारने (Maharashtra Government) जाहीर केलेल्या वेळेत पूर्ण केलेली नाही. त्यामुळे मराठा समाजात असंतोष पसरला आहे. याबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या येवला मतदारसंघातील सर्व मोठ्या गावांता साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे.

Chhagan Bhujbal
Girish Mahajan Called Manoj Jarange : गिरीश महाजन स्पष्टच बोलले, मराठा समाजाने सरकारला आणखी वेळ द्यावा!

येवला तालुक्यात मराठा समाजासाठी आरक्षणाचा विषय अत्यंत संवेदनशील बनला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी येथे भेट देऊन जाहीर सभा घेतली होती. त्यात आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाने दिलेली डेडलाइन पाळली नाही, तर व्यापक आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

आता या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्याची गरज आहे. त्यासाठी नेत्यांना गावबंदीसह तालुक्यातील प्रत्येक मंडलात मराठा युवकांनी साखळी उपोषण करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या सूचनांनुसार पुढील रणनीती ठरविण्याचेही या वेळी निश्चित करण्यात आले.

समाजाने अनेक विषयांसाठी मोठी आंदोलने यशस्वी केली आहेत. आता आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी जरांगे पाटील घेतील ती भूमिका घेऊन, एकसंघ होऊन आंदोलनाची तयारी सुरू करायची आहे. प्रत्येक मंडलात साखळी उपोषण करून आपली ताकद दाखवून देऊ. गावपातळीवरील अंतर्गत मतभेद, पक्ष, पद सर्व बाजूला ठेवून लढा उभा करण्यात येईल. या आंदोलनात एक सर्वसामान्य समाजबांधव म्हणून सर्वांनी सहभागी व्हावे. जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांनी दिलेल्या नियोजनानुसार आपणास आंदोलन उभे करण्यात येईल, असा निर्धार बैठकीत करण्यात आला.

Chhagan Bhujbal
Maharashtra Politics : राज्य सरकारकडून गरिबांच्या वस्तूंत मापात पाप!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com