Newly elected Lasalgaon Market Committee chairman D.K. Jagtap receiving blessings from Chhagan Bhujbal Sarkarnma
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : लासलगाव बाजार समितीच्या नवनिर्वाचित सभापतींनी घेतला किंगमेकर भुजबळांचा आशीर्वाद

Lasalgaon Market Committee Chairman D.K. Jagtap Seeks Blessings Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून जगताप यांचे अभिनंदन केले. तसेच या पदाच्या माध्यमातून शेतकरी वर्गाच्या हितासाठी काम करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Ganesh Sonawane

Lasalgaon APMC News : आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजारसमितीची निवडणूक शुक्रवारी (दि. ११) झाली. जवळपास सहा महिन्यांच्या खंडानंतर ही निवडणूक झाली. सभापतीपदासाठी भाजपचे नेते डी. के. उर्फ नाना जगताप यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. तर, उपसभापतीपदी ललित दरेकर यांचीही बिनविरोध निवड झाली.

सभापतींच्या नावाबाबत शेवटपर्यंत या निवडणुकीत ससपेन्स कायम होता. मात्र, अखेरच्या क्षणी माजी मंत्री व मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांनी संचालकांना नाव सूचवलं आणि जगताप सभापती झाले. छगन भुजबळ हेच या निवडणुकीत किंगमेकर ठरल्याने निवडणुकीनंतर लासलगाव बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती ज्ञानेश्वर जगताप यांनी भुजबळांच्या नाशिक येथील कार्यालयात जावून त्यांचा आशीर्वाद घेतला.

छगन भुजबळ यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून जगताप यांचे अभिनंदन केले. तसेच या पदाच्या माध्यमातून शेतकरी वर्गाच्या हितासाठी काम करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती आणि संचालक जयदत्त होळकर, राजेंद्र डोखळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

शेवटपर्यंत साथ दिल्याचं फळ

विधानसभा निवडणुकीच्या वेळेला येवला-लासलगाव मतदारसंघात जरांगे फॅक्टरचा इफेक्ट दिसून आला. अनेक मराठा नेते भुजबळांच्या विरोधात गेले. डी.के.जगताप यांनी मात्र शेवटपर्यंत भुजबळांची साथ सोडली नाही. त्याचीच पोचपावती म्हणून जगताप यांना भुजबळांनी हे बक्षीस दिल्याचं म्हटलं जात आहे.

नवनिर्वाचितांवर टांगती तलवार कायम

निवडणूक झाली असली तरी नवनिर्वाचित सभापती, उपसभापती यांच्या निवडीवर टांगती तलवार कायम आहे. कारण या प्रकरणाच्या याचिकेवरील सुनावणी येत्या 15 एप्रिलला आहे. त्यात याचिकाकर्त्याच्या बाजुने निकाल लागल्यास सभापती व उपसभापतीची निवडणूक रद्द होण्याची शक्यता आहे.

काय आहे वाद ?

सटाणा बाजार समितीच्या निवडणुकीत व्यापाऱ्यांना व अडत्यांना दोन मते देण्यात आली, पण लासलगावमध्ये त्याला नकार दिला गेला. हाच मुद्दा याचिकाकर्ते ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी उपस्थित केला आहे. एकाच जिल्ह्यातील दोन संस्थांना वेगवेगळा न्याय का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत याचिकाकर्ते ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी आपले अधिकचे म्हणणे मांडण्यासाठी अधिकचा वेळ मागितल्याने मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. आता 15 एप्रिल रोजी मा. उच्च न्यायालयाचा काय निकाल येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT