MLA Dilip Bankar : गोदावरी जलपर्णीचा प्रश्न गंभीर वळणावर, सत्ताधारी आमदारच करणार आंदोलन

MLA Dilip Bankar Protest Against Godavari River Pollution : शासनाने जर यासंदर्भात नियोजन केलं नाही, पाणवेलींचा प्रश्न सोडवला नाही. तर, आमदार दिलीप बनकर यांनी रास्ताको आंदोलन करु असा इशारा दिला आहे.
Diliprao Bankar
Diliprao BankarSarkarnma
Published on
Updated on

Maharashtra Politics : दक्षिण वाहिनी गोदावरी नदीमधील जलपर्णींचा विषय कायमचा बनला आहे. सध्या, नाशिकपासून ते नांदूरमध्यमेश्वरपर्यंत जलपर्णीचा घट्ट विळखा पडला आहे. त्यामुळे एकीकडे गोदावरीचे पावित्र्य तर दुसरीकडे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र, असे असतानाही या जलपर्णी हटविण्यासाठी प्रशासनाकडून कोणत्याही ठोस हालचाली अद्याप करण्यात आलेल्या नाहीत.

त्यामुळे गोदावरी नदीतील जलपर्णीचा हाच प्रश्न गंभीर वळणावर येऊन पोहचला आहे. त्याला कारणही तसेच आहे. गोदावरी नदी मधील जलपर्णींचा विषय मार्गी लागला नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सत्ताधारी पक्षातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांनी दिला आहे. एका रेडिओ चॅनलने यासंदर्भात बनकर यांची मुलाखत घेतली, त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Diliprao Bankar
Bachchu Kadu : बच्चू कडू मशाल घेऊन कोकाटेंच्या घरावर धडकले पण ते भेटलेच नाहीत; शेवटी फोनवरून दिलं कर्जमाफीबाबतचं आश्वासन, नेमकं काय घडलं?

वाढत्या जलपर्णीमुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्वभवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असतानाही प्रशासनाकडून मात्र यावर कोणताही उपाय होताना दिसत नाही. शासनाने जर यासंदर्भात नियोजन केलं नाही, पाणवेलींचा प्रश्न सोडवला नाही. तर, या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही रास्तारोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराच आमदार दिलीप बनकर यांनी दिला आहे.

आमदार दिलीप बनकर पुढे म्हणाले, गोदावरी नदीला जलपर्णींचा घट्ट विळखा पडला आहे. दारणासांगवी पासून तर नांदूरमध्यमेश्वर पर्यंत मोठ्या प्रमाणावर पाणवेली आहेत. यासंदर्भात अनेकदा आपण राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्ममंत्र्यांना निवेदने दिली आहेत. जिल्ह्याच्या कलेक्टरांनाही यासंदर्भात सांगितले आहे. या प्रश्नावर निश्चितच कायस्वरुपी तोडगा निघाला पाहिजे. पाणवेलींमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी तयार होते. त्या कायमस्वरुपी काढण्यासाठी काहीतरी तोडगा काढायला हवा.

सुरुवातीला तर जिल्ह्याचे कलेक्टर, एरिगेशन खात्याचे अधिकारी, नाशिक महापालिकेचे आयुक्त व जिल्हापरिषदेच्या सीईओ यांनी या प्रश्नी लक्ष घालून पुढाकार घेतला पाहिजे. भविष्यात लोकांच्या आरोग्याचा काही गंभीर प्रश्न निर्माण झाला तर हेच अधिकारी त्याला जबाबदार राहतील असा इशारा दिलीप बनकर यांनी दिला आहे. ते पुढे म्हणाले, नदीमध्ये नाशिक शहरातील घाण पाणी सोडलं जातं. त्यावर कुठल्याही प्रकरच्या प्रकीया होत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर याठिकाणी पाणवेली साचल्या आहेत. डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तत्काळ जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पुढाकार घेऊन त्या पाणवेली काढणे गरजेचे आहे.

Diliprao Bankar
Praniti Shinde : "हे संकट सर्व अल्पसंख्यांकांवर येणार..."; वक्फ बिलाचा उल्लेख करत प्रणिती शिंदेंचा मोठा दावा

शासन पैसे पुरवायला तयार आहे. पंरतू खूप मोठी समस्या असल्याने एक-दोन पोकल्यान पाठवून त्याठिकाणी वेली निघणार नाहीत. कायमस्वरुपी त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया करुन तो प्रश्न सुटला पाहीजे. त्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हापरिषद सीईओ, एरिगेशन खात्याचे व संबधित अधिकारी यांनी तत्काळ पावले उचलायला हवीत. नाशिकमधून येणाऱ्या पाण्यामुळेच या पाणवेली होतात. नाशिक महापालिकेने तिकडून नदीत येणारं पाणी जर बंद केलं किंवा त्या पाण्यावर योग्य ती प्रक्रिया करुन सोडलं तर पाणवेलींचे प्रमाण कमी होईल अस आमदार दिलीप बनकर म्हणाले.

दरम्यान, सत्ताधारी पक्षाच्या आमदारालाच प्रशासनासमोर हतबल होत आंदोलन करण्याची वेळ येत असतील तर सर्वसामन्य लोकांनी आपले प्रश्न, समस्या घेऊन दार तरी कुणाचं ठोठवायचं? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com