Lok Sabha 2024 - शिर्डी मतदारसंघ- उत्कर्षा रुपवते, अशोक गायकवाड Esakal
उत्तर महाराष्ट्र

Lok Sabha 2024 : शिर्डीत वाकचौरेंच्या विरोधात गायकवाडांची "मातोश्री"वर धाव, तर उत्कर्षा रूपवतेंची बंडाची तयारी

Lok Sabha 2024 माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंविरोधात शिवसेनेचे समन्वयक अशोक गायकवाड यांनी 'मातोश्री' गाठली, तर काँग्रेसच्या उत्कर्षा रूपवते यांनीदेखील बंडाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटात आणि काँग्रेसमध्ये सर्व काही सुरळीत आहे, असे शिर्डीकडे पाहता सध्यातरी दिसत नाही

Pradeep Pendhare

नगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काल राज्यात १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. यात शिर्डी लोकसभा मतदारसंघातून Lok Sabha 2024 माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचादेखील समावेश आहे. परंतु भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीला शिवसेनेसह महाविकास आघाडीसह इतर पक्षांतून जोरदार विरोध होऊ लागला आहे.

भाऊसाहेब वाकचौरेंविरोधात शिवसेनेचे समन्वयक अशोक गायकवाड यांनी 'मातोश्री' गाठली, तर काँग्रेसच्या Congress उत्कर्षा रूपवते यांनीदेखील बंडाचे हत्यार उपसले आहे. अशोक गायकवाड यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर होताच, त्यांनी 'मातोश्री'कडे धाव घेतली. उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांची भेट घेऊन वाकचौरे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला. Lok Sabha Politics Nagar District Maharashtra in Shiv Sena and Congress

ठाकरे यांचा विश्वासघात वाकचौरे यांनी केल्याची आठवण करून दिली. तसेच तूप घोटाळ्याची वाकचौरे यांचा कसा संबंध आहे, हेदेखील निदर्शनास आणून दिले. पक्षाने अजूनदेखील वाकचौरे यांच्या उमेदवारीचा फेरविचार करावा, अशी गळ घातली. याशिवाय वाकचौरे यांना संधी न देता चळवळीतील कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी अशोक गायकवाड यांनी केली.

शिवसेनेतील Shiv Sena अंतर्गत ही खधखद सुरू असताना महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाकडून Congress इच्छुक असलेल्या महिला आयोगाच्या सदस्या तथा सामाजिक कार्यकर्त्या उत्कर्षा रूपवतेदेखील भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीवर नाराज झाल्या आहेत. महाविकास आघाडीतून Maha Vikas Aghadi नवीन उमेदवाराला संधी देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

हेदेखील वाचा -

२००९ पासून या मतदारसंघात त्याच त्याच चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. चळवळीतील इतर कार्यकर्त्यांनादेखील संधी मिळाली पाहिजे, असा आग्रह उत्कर्षा रूपवते यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांसमोर धरला होता. परंतु भाऊसाहेब वाकचौरे यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर होताच, उत्कर्षा रूपवते यांनी त्यांच्या समाज माध्यम खात्यावरील महाविकास आघाडीच्या नेत्यांचे छायाचित्र हटवले आहे. तसेच काँग्रेसचे चिन्हदेखील हटवले आहे.

त्यामुळे उत्कर्षा रूपवते या बंडाच्या तयारीत असल्याचे सांगितले जाते. शिवसेनेला येथे सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग यशस्वीरित्या राबविता आला असता. जनतेचे प्रश्न सोडवण्याची वेळ आल्यावर गप्प बसणारा उमेदवार येथे दिला. आपण उमेदवारीबाबत सर्व पर्यायांची चाचपणी करणार असल्याचे इशारा उत्कर्षा रूपवते यांनी दिला आहे.

दरम्यान, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना स्वपक्षीय आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांसह जुळवून घेण्याचे आव्हान असणार आहे. यात विरोधक विद्यमान खासदार असेल, तर निवडणुकीत चुरशी होणार हेदेखील तेवढेच सत्य आहे. पक्षाने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास टाकल्याबद्दल त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.

महाविकास आघाडीतील तीनही पक्ष या निवडणुकीत एकत्रित आणि एक दिलाने काम करणार असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात माझ्या पाठीशी आहेत, असा दावादेखील भाऊसाहेब वाकचौरे यांनी केला आहे. विद्यमान खासदारांना मतदारसंघातील ९० टक्के लोक ओळखत नाहीत. तूप घोटाळ्याबाबत सतत आरोप होतो. त्याचे योग्य वेळी उत्तर देणार असल्याचा इशारा भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिला.

हेदेखील वाचा -

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT