Nashik Political News : नाशिक मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाने सोडू नये. या मतदारसंघात विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी मिळावी. यासाठी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते अक्षरशः हातघाईला आले आहेत. नाशिक मतदारसंघ मिळाल्याशिवाय जाणारच नाही, असा चंग बांंधलेले खासदार गोडसे मुंबईत मुख्यमंत्र्यांकडे तळ ठोकून आहेत. Hemant Godse News
महायुतीमध्ये नाशिक (Nashik) मतदारसंघावरून मोठा तिढा निर्माण झाला आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचा आहे. मात्र, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी दावा केला आहे. या दाव्याला भारतीय जनता पक्षाचादेखील पाठिंबा असल्याचे बोलले जाते. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महायुती आणि त्यांच्या सहकारी पक्षांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता कोणत्या स्वरूपात व्यक्त होईल हे अनिश्चित आहे.
शिंदे गटाचे पदाधिकारी तसेच खासदार गोडसे (Hemant Godse) यांचे समर्थक मोठ्या संख्येने पुन्हा एकदा मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पदाधिकारी अतिशय आक्रमक झाले होते. कोणत्याही परिस्थितीत नाशिकचे मतदारसंघ राष्ट्रवादीचे अजित पवार गटाला सोडू नये, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नाशिक मतदारसंघ शिंदे गटाकडेच राहावा, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. याबाबत कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहावे, योग्य वेळी निर्णय होईल, असे आश्वासन दिले. मात्र, या आश्वासनाने कार्यकर्त्यांचे समाधान झाल्याचे दिसत नाही.
या मतदारसंघाबाबत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी (ता. २८) रात्री उशिरा मुंबईत चर्चा झाली. यामध्ये नाशिकचा मतदारसंघ अजित पवार गटाला देण्याबाबतची तडजोड करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार होता. सातारा आणि नाशिक या मतदारसंघांची अदलाबदल करण्याचादेखील प्रस्ताव आहे. तो प्रस्ताव मान्य झाल्यास नाशिक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना उमेदवारीचा मार्ग मोकळा होणार आहे.
प्रत्यक्षात या बैठकीत काय निर्णय झाला ते स्पष्ट झालेले नाही. याबाबत आज मुख्यमंत्री शिंदे सकाळी अकराला पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार होते. त्यामुळे बरेचशे पदाधिकारी तसेच खासदार गोडसे मुंबईत मुख्यमंत्र्यांकडे तळ ठोकून आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.