Nashik News : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची नगर येथे सभा झाली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) आणि भारतीय जनता पक्षावर ( Bjp ) गंभीर टीका केली. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी संतापले आहेत. महाविकास आघाडीचे नगर दक्षिण मतदारसंघातील उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी संजय राऊत यांची गुरुवारी सभा झाली. यावेळी राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रावर अन्याय केला, असे सांगत त्यांची तुलना औरंगजेबाशी केली.
येत्या लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha Election ) महाराष्ट्राचे मतदार आणि शिवसेना औरंगजेबाप्रमाणेच नरेंद्र मोदी यांना देखील महाराष्ट्राच्या मातीत दफन करील, असेही राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले. त्याच्या तीव्र प्रतिक्रिया नाशिक शहरात उमटल्या. यासंदर्भात भाजपचे प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"शिवसेना नेते राऊत यांनी अतिशय प्रक्षोभक विधान केले आहे. कार्यकर्ते नाराज आहेत. अत्यंत बेजबाबदार विधान करीत सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने झाला आहे. राऊत यांचे वक्तव्य दिशाभूल करणारे आहे. यातून त्यांचा फूट पाडण्याचा इरादा असावा. निवडणुकीच्या निमित्ताने सामाजिक शांततेत हा अडथळा आहे," असं पेशकार यांनी म्हटलं.
"महाराष्ट्रातील जनता भारतीय जनता पक्षाच्या मागे उभी आहे. आतापर्यंत झालेल्या दोन्ही टप्प्यांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्याचे उमेदवार शंभर टक्के विजयी होणार आहेत. त्यांच्या बाजूने कौल दिसत असल्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली आहे. त्या संतापात असते भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान मोदी यांच्या विषयी, अशी विधाने करीत आहेत. त्याचा जनतेवर विपरीत परिणाम होईल. जनता महाविकास आघाडीचा दारुण पराभव करेल," असा दावाही त्यांनी केला.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी अंबड पोलिसांनी राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, असा आग्रह धरला. पोलिसांनी कार्यकर्त्यांनी दिलेला तक्रार अर्ज दाखल करून घेतला आहे. याबाबत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलिस त्याचा तपास करणार आहेत, असे सांगण्यात आले.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.