Sanjay Raut On Sharad Pawar : 'शरद पवार हे राष्ट्रवादी पक्षाबद्दल बोलत आहेत का? हे त्यांनी..' ; संजय राऊतांचं वक्तव्य!

Sanjay Raut News : जाणून घ्या, संजय राऊतांनी नेमकं काय म्हटलं आहे?
Sanjay Raut On Sharad Pawar
Sanjay Raut On Sharad PawarSarkarnama

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले आहेत. राजकीय वातावरण चांगलंच तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर राजकीय नेते मंडळींच्या विविध वक्तव्यांवरून चर्चा रंगत आहेत. दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही बुधवारी एक विधान केलं ज्यावरून चांगलीच चर्चा रंगली आहे.

"पुढील दोन वर्षांत विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेसबरोबर अधिक समन्वयाने काम करतील. यापैकी काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचं हित लक्षात घेऊन काँग्रेसमध्ये विलीन होतील." असं विधान एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार(Sharad Pawar) यांनी केलं आहे. यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. तर सर्वासामान्यांमधूनही तर्कवितर्क लढवले जात आहेत. याचबरोबर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Raut On Sharad Pawar
Prithviraj Chavan News : शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन होणार? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितले !

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. '' शरद पवारांचा पक्ष हा राष्ट्रीय आहे. शिवाय त्यांचे केरळमध्ये मंत्री आहेत आणि नागालँडमध्ये उमेदवारही निवडून आलेले आहेत. त्यामुळे ते कोणत्या प्रादेशिक पक्षाबाबत बोलत आहेत, हे मला माहीत नाही. महाराष्ट्र असो किंवा इतर राज्य, प्रादेशिक पक्षांची एक अस्मिता असते. प्रादेशिक पक्षांकडून ज्यावेळी राष्ट्रीय पक्ष होण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी त्यांचा पराभव झाला. याचं ताजं उदाहरण तेलंगणमधील बीआरएस आहे. आता शरद पवार हे राष्ट्रवादी पक्षाबद्दल बोलत आहेत का? हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे.''

तर विलनीकरणाचा हाच निकष राष्ट्रवादीबाबत ( शरदचंद्र पवार ) लागू होईल का? या प्रश्नावर शरद पवार यांनी म्हटलं, "मला काँग्रेस आणि राष्ट्रवादीत कोणताही फरक दिसत नाही. वैचारकिदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरूंची विचारसरणी मानणारे आहोत. प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत एकत्र येण्याच्या प्रक्रियेबाबत मी आत्ताच बोलू शकणार नाही. सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय काहीही बोलणार नाही.

Sanjay Raut On Sharad Pawar
Sharad Pawar News : प्रादेशिक पक्षांचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण ते उद्धव ठाकरेंचे विचार; शरद पवार काय म्हणाले?

तसेच, वैचारिकदृष्ट्या आमचा पक्ष काँग्रेसच्या जवळचा आहे. पण, आमच्या पक्षाबाबत कोणतंही पाऊल उचलताना किंवा रणनीती ठरवताना सामूहिक पद्धतीनं निर्णय घेतला जाईल. पंतप्रधान मोदी यांच्याशी जुळवून घेणं किंवा त्यांचे विचार पचनी पडणं आमच्यासाठी अवघड आहे," असं शरद पवार यांनी सांगितलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com