महायुतीच्या जागावाटपाचा तिढा वरिष्ठ पातळीवर सुटल्याचे सांगितले गेले. मंगळवारी ( ता.26 मार्च ) सायंकाळपर्यंत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल. या यादीनंतरच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा ( Shirdi Lok Sabha Election 2024 ) तिढा सुटला की नाही, हे कळेल. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी मलाच कामाला लागा, अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे शिर्डीत महायुतीचा उमेदवार म्हणून शंभर टक्के मीच असेल. मी निवडणुकीत चपटी आणि पाकीट वाटले नाही, तरी जनतेचा माझ्यावर विश्वास असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे ( Sadashiv Lokhande ) यांनी केला आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीत शिर्डी लोकसभा मतदारसंघ ( Shirdi Lok Sabha Election 2024 ) कोणाला याची खलबते सुरू आहेत. आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. यानंतर बरेच काही चित्र स्पष्ट होईल. खासदार सदाशिव लोखंडे ( Sadashiv Lokhande ) यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मीच उमेदवार असल्याचा दावा पत्रकार परिषद घेऊन केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खासदार लोखंडे म्हणाले, "शिर्डीच्या जनतेने आणि युतीच्या कार्यकर्त्यांनी मागील दोन्ही निवडणुकीत शिवसेनेला चांगल्या मतांनी निवडून दिले. मला मुख्यमंत्र्यांनी पुन्हा कामाला लागा, असे आदेश दिलेत. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आणू शकलो. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कामे केली. रखडलेली अनेक कामे मार्गी लावली असून, मला ४० वर्षांचा राजकीय अनुभव आहे. केंद्रात साईबाबांच्या नगरीतला खासदार म्हणून मला ओळखतात. साईबाबांच्या नावाचा उपयोग 182 गावांना पाणी मिळवून देण्यासाठी केला. मी निवडणुकीत चपटी आणि पाकीट वाटले नाही, तरी जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला."
"तुपामध्ये पैसे खाणारा खासदार पाहिजे का? हे जनतेने ठरवायचे आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांची 32 वर्षे प्रशासकीय सेवा झाली. माझी 40 वर्षे जनतेत सेवा झाली. दिल्लीतील स्टिंग ऑपरेशनमध्ये मी 10 कोटी रुपये नाकारले होते आणि त्याने साईबाबा संस्थानच्या घोटाळ्यात दहा लाख खाल्ले. मी त्याच्यापेक्षा बरा असून, लोकांना दहा कोटी नाकारणारा पाहिजे की दहा लाख खाणारा?," असा सवालदेखील खासदार लोखंडे यांनी या वेळी उपस्थित करत भाऊसाहेब वाकचौरेंवर टीका केली.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.