Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेला एकटे पाडण्याचा महायुतीचा प्रयत्न?

Nashik Lok Sabha Election 2024 : शिंदे गटाला भाजप अन् अजित पवार गट असेच दोन पक्ष छुपा विरोध करीत होते. त्यात आता...
devendra fadnavis eknath shinde ajit pawar
devendra fadnavis eknath shinde ajit pawarsarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिक मतदारसंघात शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत गोडसे ( Hemant Godse ) यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या या डावपेचाने मतदारसंघ हिसकावण्याचे राजकारण करणाऱ्या भाजप आणि अजित पवार गटाला मोठा धक्का बसला. मात्र, आता या दोन्ही पक्षांबरोबरच मनसेचादेखील महायुतीमध्ये समावेश झाल्याने राजकारण बदलण्याची चिन्हे आहेत.

गेल्या आठवड्यात शिवसेना शिंदे गटाचा मेळावा नाशिकमध्ये झाला. या मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे ( Shrikant Shinde ) यांनी 'सौ सुनार की, एक लुहार की' या म्हणीचा प्रत्यय आणून दिला. मतदारसंघ मिळावा म्हणून प्रयत्न करणाऱ्या भाजप आणि अजित पवार गटाला त्यांनी मोठा धक्का दिला. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना विश्वासात न घेताच खासदार शिंदे यांनी हेमंत गोडसे ( Hemant Godse ) यांची उमेदवारी जाहीर केली. या निर्णयाने नाशिक मतदारसंघ आपल्याला मिळावा ,यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपला मोठा धक्का बसला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीच्या संकेतानुसार हेमंत गोडसेंना भाजपला पाठिंबा देण्यापूर्वीच उमेदवारीचे आश्वासन देण्यात आले होते. त्यावर शिंदे गट ठाम आहे. मात्र, लोकसभा निवडणूक ( Lok Sabha Election 2024 ) तोंडावर असताना भाजपचे धोरण रोज बदलत आहे. त्याचा फटका सहकारी पक्षांना बसण्याची शक्यता आहे.

devendra fadnavis eknath shinde ajit pawar
Ajit Pawar Ahmednagar News : नगर राष्ट्रवादीत 'ऑल इज नॉट वेल', लंके सोडून जाण्याच्या तयारीत असतानाच...

खासदार गोडसे ( Hemant Godse ) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी हा मतदारसंघ मिळावा म्हणून मुंबईत जोरदार लॉबिंग केले. स्थानिक पातळीवर पक्ष नेत्यांकडे आग्रह धरला. दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या कार्यालयात जोरदार घोषणाबाजीदेखील करण्यात आली. भाजपकडून असे प्रयत्न होत असताना अजित पवार गटाचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील अप्रत्यक्षरीत्या हेमंत गोडसे यांना टीकेचे लक्ष्य केले होते. या स्थितीत शिंदे गटाचे पदाधिकारी मूकदर्शक बनल्याचे दिसले. शिंदे गटाच्या नेत्यांनी भाजप व सहकारी पक्षांवर निवडणुकीच्या विषयावरून टीका करू नये, कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये अशा सूचना वरिष्ठ स्तरावरून दिल्याचे कळते. त्यामुळे शिंदे गटाचे उमेदवार आणि खासदार हेमंत गोडसे यांची अस्वस्थता वाढत आहे.

मतदानाला दोन महिन्यांचा कालावधी असल्याने हे राजकारण केव्हा थांबणार आणि उमेदवारीची अधिकृत घोषणा केव्हा होणार, याची सगळ्यांना उत्सुकता आहे. युतीतील स्थानिक नेते आणि इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. याआधी शिंदे गटाला भाजप आणि अजित पवार गट असे दोनच पक्ष छुपा विरोध करीत होते. आता त्यात मनसे या तिसऱ्या भिडूची साथ त्यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान नाशिक लोकसभा मतदारसंघात तरी महायुतीचे घटक पक्ष आणि स्थानिक नेत्यांमध्ये सर्व काही आलबेल नाही, असा संदेश गेला आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

devendra fadnavis eknath shinde ajit pawar
Girish Mahajan News : महाजनांच्या पोटातले ओठावर आलेच; म्हणाले, 'त्यांचा' अन् माझा छत्तीसचा आकडा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com