mula dam ahmednagar sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Water Cut News : लोकसभेच्या धामधुमीत अहमदनगरमध्ये पाणीबाणी

Irrigation Department News : जलसंपदा विभागाने बिगर सिंचनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. चालू एप्रिल महिन्यापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होईल.

Pradeep Pendhare

लोकसभा निवडणुकीची ( Lok Sabha Election 2024 ) धामधूम सुरू झाली असतानाच नगर जिल्ह्यात जलसंकट गंभीर झाले आहे. अहमदनगर महापालिकेसह जिल्ह्यातील अनेक शहरांच्या पाणी पुरवठ्यात जलसंपदा विभागाने ( Irrigation Department ) 20 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. वर्षभराच्या कोट्यात वापरानुसार ही कपात असणार आहे.

नगर जिल्ह्यातील मध्यम आणि मोठ्या प्रकल्पात अवघा 39 टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. 31 जुलैपर्यंत धरणात पिण्याचे पाणी पुरले पाहिजे. जायकवाडी धरणात पाणी सोडले गेले. त्यामुळे जलसंपदा विभागाने ( Irrigation Department ) बिगर सिंचनात 20 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. चालू एप्रिल महिन्यापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होईल. या निर्णयामुळे नगर जिल्ह्यातील मोठ्या शहरात पाणीबाणी, अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. प्रशासनाला पाण्याच्या नियोजन करावे लागणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगर महापालिकेसह मुळा धरणावर अवलंबून असलेल्या देवळाली प्रवरा, बारागाव, राहुरी, नांदूर, सोनई, शनिशिंगणापूर, बुऱ्हाणनगर, मिरी-तिसगाव या प्रादेशिक पाणीयोजनांना त्याचा फटका बसेल. जुलैपर्यंत पिण्याचे पुरले पाहिजे. यानुसार जलसंपदा विभागाने हा निर्णय घेतला आहे. समन्यायी पाणीवाटप धोरणाच्या निर्णय नेहमीच नगर जिल्ह्याच्या मुळावर येतो. हे पाणी संकटदेखील त्यातून आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

गेल्या जानेवारीमध्ये नगर जिल्ह्याच्या उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांमधून भंडारदरा, निळवंडे आणि मुळा धरणातून सुमारे पाच टीसीएम पाणी जायकवाडीला सोडण्यात आले. आता उन्हाची तीव्रता वाढल्याने बाष्पीभवन 39 टक्के झाले आहे. यंदा पाऊस कमी झाला आहे. अवकाळी पावसामुळं पर्जन्यमानाचा आगामी काळात काय फरक पडेल सांगता येत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने वर्षिक कोट्यात 20 टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.

नगर जिल्ह्याच्या धरणातील पाणीसाठा (दशलक्ष घनफूटमध्ये)

भंडारदरा : 5042 , निळवंडे : 1255, मुळा : 12550, आढळा : 370, मांडओहोळ : 45, पारगाव घाटशीळ : कोरडे, सीना : 686, खैरी : 90, विसापूर : 243.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT