नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी नगर दक्षिणमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीची घोषणा केली. लंके यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा करताना विखे पिता-पुत्रावर सडकून टीका केली. यावर नगर दक्षिणचे भाजप उमेदवार खासदार सुजय विखे ( Sujay Vikhe ) यांनी जशास-तसं प्रत्युत्तर दिले जाईल, असे सांगितले. सभांमधून 'करारा जवाब दूंगा', असे काहीसे सचूक सांगत सध्या माझे कार्यकर्ते अशांना उत्तर देण्यास सक्षम असल्याचे खासदार विखे यांनी म्हटले आहे.
भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे ( Sujay Vikhe ) यांच्याविरोधात कोण असेल, याची चर्चा होती. नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) यांची भेट घेतल्यानंतर चित्र काहीसे स्पष्ट झाले होते. परंतु, नीलेश लंके यांनी शुक्रवारी ( 29 मार्च ) पारनेरमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळावा घेऊन शरद पवार यांच्याबरोबर जात लोकसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर केले. यामुळे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे नीलेश लंके यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.
नीलेश लंके यांनी मेळाव्यातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे ( Radhakrishna Vikhe ) आणि त्यांचे पुत्र खासदार सुजय विखे ( Sujay Vikhe ) यांच्यावर जोरदार टीका केली. "विखे पिता-पुत्रांच्या दडपशाही आणि यंत्रणेविरोधात आपण शरद पवार यांच्याबरोबर आहोत," असे सांगून निवडणुकीच्या रिंगणात आल्याचे लंकेंनी जाहीर केली. लंकेंनी या वेळी विखे पिता-पुत्रावर जोरदार टीका केली.
भाजप खासदार सुजय विखेंनी यावर जशास-तसे प्रत्युत्तर दिले आहे. सुजय विखे म्हणाले, "निवडणुकीमध्ये कोणी ना कोणी उमेदवार समोर येणारच आहे. आम्ही निवडणुकीची तयारी खूप अगोदरपासून सुरू केली होती. जनतेपुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासकामांचे पुस्तक आम्ही ठेवणार आहोत. लंकेंनी केलेल्या टीकेला उत्तर नक्कीच दिले जाईल. मात्र, ते उत्तर सभेमध्ये दिले जाईल. आता सध्या माझे कार्यकर्ते उत्तर देण्यात सक्षम आहेत."
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजप खासदार सुजय विखे दिवाळीच्या पूर्वीपासून नगर दक्षिण मतदारसंघात तळ ठोकून आहेत. नगर दक्षिणमधील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा दौरा त्यांनी पूर्ण केला आहे. अलीकडच्या काळात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सांस्कृतिक कार्यक्रमातून त्यांनी शक्तिप्रदर्शन केले आहे. तसेच मतदारांसमोर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात केलेल्या विकासकामांचे प्रगती पुस्तकच घेऊन जाणार आहे. विकासकामांच्या जोरावर मते मागणार असल्याचे खासदार विखेंनी पूर्वी जाहीर केले आहे. त्यामुळे खासदार विखे मतदारांसमोर विकासकामांचा आलेख ठेवण्याबरोबर विरोधी उमेदवाराला जशास-तसे उत्तर देणार असल्याची तयारी ठेवल्याचे दिसते. लंके आणि विखे यांच्यात आरोपांच्या फैरी उच्चतम पातळीवर धडाडणार, असेच काहीसे वातावरण आहे.
( Edited BY : Akshay Sabale )
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.