Chhagan Bhujbal, Devendra Fadnavis, Ajit Pawar  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal News : मी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार ही केवळ अफवा!

Sampat Devgire

Nashik Constituency News : नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal News) यांचे नाव चर्चेत आहे. महायुतीच्या जागावाटपात या जागेचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे भुजबळ कोणत्या चिन्हावर निवडणूक लढविणार याविषयी भिन्न मतप्रवाह आहेत.

शिवसेना अन् भाजपनेही या मतदारसंघावर दावा केलेला आहे. विद्यमान आमदारांचा पत्ता कट करून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची शक्यता असली तरी भाजपचे स्थानिक नेतेही मागे हटण्यास तयार नाहीत, असे चित्र आहे.

महायुतीच्या जागावाटपात नाशिक मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने मागितला आहे. यासंदर्भात भाजपचे (BJP) स्थानिक आमदार आणि पदाधिकारी आग्रही आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे त्यांनी ही मागणी मांडली आहे. फडणवीस यांनी देखील नाशिकच्या जागेचा आग्रह धरला आहे. अशा स्थितीत उमेदवार आणि मतदार संघ याबाबत विविध दावे करण्यात येत आहेत.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे नाशिक मतदारसंघातील इच्छूक उमेदवार आहेत. याबाबत भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनी काही सूचना केल्या आहेत. या संदर्भात भुजबळ म्हणाले, महायुतीच्या जागा वाटपात नाशिकचा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला हवा आहे.

या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी नाशिक येथून भुजबळ हे उमेदवार असतील असे स्पष्ट केले आहे. ही उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून असेल. त्यामुळे मी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार नाही. याबाबतच्या चर्चा केवळ अफवा आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सध्या भुजबळ भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर उमेदवारी करतील, अशा चर्चा पसरविल्या जात आहे. त्यात काहीही तथ्य नाही. ही सगळी बातमी खोटी आहे. या अफवा आहेत. त्याला कशाचाही आधार नाही. यापेक्षा अधिक मी काहीही सांगू शकत नाही. माझ्या उमेदवारी बाबत पक्षाने अथवा मी कोणतीही अट टाकलेली नाही, हे देखील भुजबळ यांनी स्पष्ट केले.

भुजबळ यांनी आज महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त शहरातील विविध भागांना भेटी दिल्या. कार्यकर्ते आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते देखील होते. माजी खासदार समीर भुजबळ, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT