Hemant Godse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Hemant Godse News : उमेदवारी मिळताच खासदार हेमंत गोडसे पोहोचले थेट भाजप कार्यालयात

Lok Sabha Election 2024 : मागील अनेक दिवसांपासून नाशिकबाबत महायुतीमध्ये तिढा होता. आज अखेर हा तिढा सुटला असून पुन्हा एकदा गोडसेंना उमेदवारी देण्यात आली आहे. आता महायुतीच्या सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन प्रचाराला सुरूवात करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

Sampat Devgire

Nashik Constituency News : खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse News) यांना आज नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी जाहीर झाली. सुमारे महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर गोडसे यांना ही गोड बातमी मिळाली. त्यामुळे उमेदवारी जाहीर होताच त्यांनी सहकारी पक्ष्यांची संवाद साधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महायुतीच्या सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन प्रचाराला सुरूवात करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

आज सकाळी हेमंत गोडसे यांना शिवसेनेच्या शिंदे गटाकडून नाशिक मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाली. उमेदवार जाहीर होताच खासदार गोडसे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यासोबत थेट भारतीय जनता पक्षाच्या (BJP) कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर बऱ्याच वेळ भाजपचा स्कार्फ घालून खासदार गोडसे आणि त्याचे सर्व सहकारी भाजपचे पक्ष कार्यालयात थांबून होते.

मीडियाशी बोलताना खासदार गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मानले. उमेदवारी जाहीर करताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी विविध सूचना केल्या आहेत. सर्व सहकारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही आजपासून काम सुरू करीत आहोत. येत्या अठरा दिवसांत सबंध मतदारसंघ पिंजून काढण्यात येईल, असे गोडसे म्हणाले. (Lok Sabha Election 2024)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक मतदारसंघ हा हिंदुत्ववादी विचारांचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानणारा मतदारसंघ आहे. येथील मतदार मोठा प्रतिसाद देतील. यावेळी देखील मोठ्या मताधिक्यांनी शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत यश मिळेल, असा दावा गोडसे यांनी केला.

पालकमंत्री भुसे यांनी उद्या महायुतीचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती दिली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहतील. सबंध शहरात खासदार गोडसे यांना उमेदवारी मिळाल्याने आनंद झालेला आहे. हा आनंदोत्सव नागरिकांना देखील पाहायला मिळेल. महायुतीचे सर्व सहकारी पक्ष आणि इच्छुक उमेदवार आता उमेदवारीची घोषणा झाल्याने नाराजी सोडून प्रचाराच्या कामाला लागतील. याबाबत कोणतीही शंका नाही, असे भुसे यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाशिक मतदारसंघासाठी प्रमुख इच्छुक उमेदवार होते. खासदार गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने ते नाराज नसतील. त्यांचे समर्थक देखील पूर्ण क्षमतेने शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा प्रचार करतील. लवकरच आम्ही शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहोत. त्यानंतर सायंकाळी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होईल. यातून प्रचाराची सुसूत्रता निश्चित होईल. आता कोणतीही नाराजी राहिलेली नाही असा दावाही भुसेंनी केला.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT