Lok Sabha Election 2024 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : रोहित पवार नौटंकी करण्यात तरबेज; राम शिंदेंचा टोला

Ram Shinde Vs Rohit Pawar : "कोणी मतदारसंघात आणले की आपणच आणले, असा यांचा आटापिटा सुरू असतो. कर्जतच्या पाटेगाव एमआयडीसीत स्थानिक शेतकरी नसून बाहेरचीच माणसे होती."

Pradeep Pendhare

Ahmednagar News : महायुती भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे यांच्यासाठी झालेल्या प्रचार सभेत भाजप आमदार राम शिंदे यांनी आमदार रोहित पवारांवर चांगलाच हल्ला चढवला. 'येथील स्थानिक लोकप्रतिनिधी नौटंकी करण्यात तरबेज असल्याचा टोला', आमदार शिंदेंनी आमदार रोहित पवारांचे नाव न घेता लगावला आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभेत जोरदार भाषण झाले. त्यापूर्वी भाजप आमदार राम शिंदे यांनी त्यांच्या भाषणात आमदार रोहित पवारांना लक्ष केले. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अड बाळासाहेब शिंदे, अनिल गदादे, सभापती काकासाहेब तापकीर, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, शिवसेना महिला आघाडीच्या डॉ. शबनम इनामदार, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कर्जतच्या कोंभळी एमआयडीसीसाठी अजित पवारांची मोठी मदत झाल्याचे सांगून येथील स्थानिक लोकप्रतिनिधी नौटंकी करण्यातच तरबेज, असल्याचा टोला आमदार शिंदेंनी आमदार पवारांचे नाव न घेता लगावला. 'कोणी मतदारसंघात आणले की आपणच आणले, असा यांचा आटापिटा सुरू असतो. कर्जतच्या पाटेगाव एमआयडीसीत स्थानिक शेतकरी नसून बाहेरचीच माणसे होती. त्यांचे भले करण्याचा घाट चालवला होता', असा गंभीर आरोप आमदार शिंदेंनी केला.

'तुकाई चारी सुरू होती, ती यांनी बंद पाडली. हायब्रीड रस्ता बंद पाडला. कर्जत नगरपंचायतची निवडणुकीत दमबाजी केली. आरोग्य कार्ड मोदींचे आणि कव्हर येथील लोकप्रतिनिधीचे असा यांचा धंदा. लढायचे होते तर समोर उभा राहून लढले पाहिजे. असले राजकारण करून स्वताची पोळी भाजून घेतली', असा आरोप आमदार शिंदे यांनी रोहित पवारांवर (Rohit Pawar) केला. दादा सोबत असल्याने त्यांचा कारखाना देखील आपल्यासोबत आहे. त्यामुळे मतदारसंघातील ऊसाचा प्रश्न मिटल्याचे समाधान आमदार शिंदे यांनी व्यक्त केले.

म्हणून आपल्याकडे मतदानाचा मागण्याचा अधिकार -

खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी ही निवडणूक देशहिताची असून यावर कोणी बोलत नाही. सध्या विकासावर न बोलता धनशक्ती विरुद्ध जनशक्तीवर सांगितली जाते. पावणे पाच वर्षाच्या आमदाराने पारनेर मतदारसंघात काय केले? ते सांगताना दिसत नाही. काम केले तर, सांगेन ना? असा सवाल नाव न घेता नीलेश लंकेला टोला लगावला. आपण विकासाचे काम केले म्हणून, आपल्याकडे मतदान मागायचा अधिकार आहे, असे खासदार विखेंनी सांगितले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT