narendra modi sanjay raut sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut news : "कांदा निर्यातबंदीची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक"

Sanjay raut On Bjp : "गुजरातच्या व्यापारी आणि ठेकेदारांच्या भल्यासाठी भाजपने निर्यातबंदीची फसवी घोषणा केली," अशी टीका राऊतांनी केली आहे.

Sampat Devgire

Nashik News : "राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी भाजपच्या धोरणावर अत्यंत आक्रमक आहेत. याची जाणीव झाल्याने भाजपने निर्यात खुली केल्याची खोटी घोषणा केली आहे. या गोष्टीचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काहीही लाभ होणार नाही," असा दावा करत शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

महाविकास आघाडीचे नाशिकमधील उमेदवार राजाभाऊ वाजे ( Rajabhau Waje ), दिंडोरीतील उमेदवारी भास्करराव भगरे ( Bhaskar Bhgare ) यांनी सोमवारी, 29 एप्रिल शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat), खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांसह विविध नेते उपस्थित होते. या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी भारतीय जनता पक्षाच्या घोषणांची अक्षरशा चिरफाड केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"गेल्या दहा वर्षांत अनेक खोट्या घोषणा करीत राजकारण केले आहे. एवढे खोटे बोलणारा पंतप्रधान मी आजवर कधीही पाहिलेला नाही. त्यांना आपल्या पक्षाच्या हितापलीकडे काहीही दिसत नाही. हे आता जनतेला समजले आहे. त्यामुळे भाजप आणि मोदी दोघेही प्रचंड घाबरले आहेत," असं राऊतांनी म्हटलं.

"नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघांत महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार आहेत. नाशिक मतदारसंघात तर महायुतीची अक्षरशा ओढाताण सुरू आहे. त्यांना उमेदवारदेखील मिळालेला नाही. अशा स्थितीत महाराष्ट्रात मोठ्या विजयाचा दावा करणाऱ्या महायुतीचा फुगा फुटला आहे. मतदारांनी भाजपचा खोटा प्रचार आणि सरकारी यंत्रणेचा उपयोग करून राजकीय तोडफोड हे दोन्ही राजकीय आणि घृणास्पद प्रकार पाहिले आहेत. त्याची किंमत येत्या निवडणुकीत भाजपला मोजावी लागेल," असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.

"भाजपला महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबई कंगाल करण्याची राजकीय योजना त्यांनी आखली आहे. मात्र, त्यांचे हे स्वप्न शिवसेना आणि शरद पवार असेपर्यंत पूर्ण होऊ शकणार नाही. याची जाणीव त्यांना झाली. त्यानंतर त्यांनी तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून महाराष्ट्रातील सरकार पाडले. शिवसेनेत फूट पाडली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही तोडफोड केली. हे राजकारण मराठी माणूस आणि महाराष्ट्राची संस्कृती यांच्या विपरीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता याला थारा देत नाही, हे आता त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी प्रचारातून आपला राग व्यक्त करताना दिसतात," असंही राऊतांनी म्हटलं.


( Edited By : Akshay Sabale )

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT