Nashik Constituency 2024: महायुतीने निर्माण केला मुख्यमंत्र्यांपुढे नाशिकच्या उमेदवारीचा पेच?

Nashik Lok Sabha Election 2024: नाशिकची जागा शिवसेनेच्या (Shivsena) शिंदे गटाला मिळाली आहे. मात्र उमेदवार देताना तो अन्य सहकारी पक्षांना मान्य असलेला चेहरा असावा. यामुळे मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

CM Eknath Shinde: नाशिक लोकसभेच्या (Nashik Lok Sabha) निवडणुकीला अवघे वीस दिवस उरले आहेत. मात्र अद्याप महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला नाही. याला महायुतीतील सहकारी पक्षांमध्ये असलेली राजकीय ओढाताण कारणीभूत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात प्रस्थापित नेत्यांना धक्का देणारा निर्णय होण्याची चर्चा रंगली आहे.

राज्यातील चार मतदारसंघांबाबत अद्याप महायुतीत एकमत झालेले नाही. यामध्ये ठाणे आणि नाशिक हे दोन (Thane and Nashik) मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहेत. नाशिकच्या जागेसाठी भारतीय जनता पक्ष अजित पवार गट आणि शिंदेंची शिवसेना असे तिन्ही पक्ष आग्रही आहेत. नाशिकची जागा शिवसेनेच्या (Shivsena) शिंदे गटाला मिळाली आहे. मात्र उमेदवार देताना तो अन्य सहकारी पक्षांना मान्य असलेला चेहरा असावा. यामुळे मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री दबावाखाली आले की काय? असं बोललं जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे ही दोन नावे अग्रक्रमाने घेतली जात होती. मात्र ही नावे पुढे येतात त्यांना पक्षांतर्गत विरोध देखील झाला. या विरोधकांमुळे ही दोन्ही नावे मागे पडतात की काय, अशी स्थिती आहे. यातूनच अनेक नवे चेहरे इच्छुक म्हणून रोज चर्चेत येत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते गोंधळले आहेत. त्यापेक्षाही अधिक गोंधळ नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असली, तरीही उमेदवारीचा निर्णय रखडला आहे.

खासदार गोडसे यांनी एक महिन्यापासून प्रचार सुरू ठेवला आहे. शिंदे गटाचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक येथे झालेल्या मेळाव्यात उमेदवार म्हणून गोडसे यांचे नाव जाहीर केले होते. मात्र त्यावर सहकारी पक्षांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या त्यातूनच जागावाटप आणि उमेदवार दोन्हींबाबत महायुतीचे कार्यकर्ते आक्रमकपणे परस्परांविरोधात ठाकले होते. या पार्श्वभूमीवर काल कोल्हापूर येथे झालेल्या चर्चेतून नाशिक आणि ठाणे या दोन्ही जागा मुख्यमंत्री शिंदे गटाकडे आहेत.

यामध्ये नाशिकला उमेदवार देताना तो भारतीय जनता पक्षाला उमेदवार मान्य असायला हवा, तरच सहकारी पक्ष शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मनापासून सक्रिय होतील. अन्यथा पक्षांतर्गत गटबाजीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. हे टाळण्यासाठी सगळ्यांना संमत असलेला चेहरा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Eknath Shinde
Nashik Lok Sabha Constituency : शिवसेना म्हणते, 'शांतिगिरी महाराजांनी निवडणुकीतून माघार घ्यावी'

नवा चेहरा समोर येण्याची शक्यता

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे महायुतीतील नेते असंतोष आणि बंडखोरी टाळण्यावर प्रामुख्याने भर देणार आहेत. त्यात नवे नाव किंवा चेहरा समोर येण्याची शक्यता आहे. हा उमेदवार जाहीर करताना आणखीन एक दोन दिवसाचा कालावधी लागण्याची चिन्हे आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार राजाभाऊ वाजे प्रचारात खूपच पुढे निघून गेले आहेत. त्यांना स्पर्धा करू शकेल असा प्रभावी उमेदवार देण्याचा महायुतीचा प्रयत्न असेल.

Eknath Shinde
Lok Sabha Election 2024 : नाशिकमध्ये महायुती क्लीनस्वीप मिळविण्यासाठी खेळी खेळणार की मैदान प्रतिस्पर्ध्यांना सोपवणार?

यामध्ये शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, ठाकरे गटाने उमेदवारी नाकारलेले भगूरचे माजी नगराध्यक्ष विजय करंजकर अथवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे अशी प्रस्थापित मात्र नवीन नावे उमेदवार म्हणून पुढे येऊ शकतात. यातील कोणाला उमेदवारीची लॉटरी लागते याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com