Shantigiri Maharaj, Jayant Dinde, Swami Kanthanand  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : ज्यांनी मोदींचे कान पकडायचे, तेच गाडीत बसण्यासाठी उतावीळ!

Arvind Jadhav

Nashik News : नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे संकेत स्वामी कंठानंद आणि महामंडलेश्वर शांतीगिरी महाराजांनी दिले आहेत. त्यावरून शिवसेनेने टीकास्त्र सोडले आहे. चुकले म्हणून ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कान पकडायला हवेत, तेच साधू महंत मोदींच्या गाडीत बसण्यासाठी उतावीळ झाले आहेत, अशी टीका शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांनी केली आहे. (Lok Sabha Election 2024)

नाशिक लोकसभा (Nashik Lok Sabha) जागा भाजपा लढणार की शिवसेना (शिंदे गट) हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, या जागेवर लढण्यासाठी स्वामी कंठानंद आणि महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज पुढे आले आहेत. शांतीगिरी महाराजांचा भक्त परिवार मोठा आहे. तर, कंठानंद स्वामींचे सामाजिक काम मोठे आहे. त्यांच्यासाठी काही उद्योजक, व्यापारी आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी थेट देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) साकडे घातले आहे.

लोकसभेला अद्याप वेळ असून, तोपर्यंत ही संख्या वाढू शकते. मुख्यत्वेसाधू महंताचा कल हा भाजपकडून (BJP) लढण्याचा आहे. याबाबत टीका करताना संपर्कप्रमुखजयंत दिंडे म्हणाले की, नाशिक ही साधू संतांचीच भूमी आहे. येथील साधू महंत धर्माला चालना देण्याचे काम करीत आले आहेत. आता यातील काही साधू महंत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. हा त्यांचा वैयक्तीक निर्णय आहे. मात्र, साधू महंताचं काम सत्ताधिशांवर अंकुश ठेवण्याचे असते. तशीच आपली हिंदू धर्म व्यवस्था आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राम मंदिर सोहळ्यावेळी देशातील शंकराचार्यांनी ते केले. इतरांनी त्यांना साथ दिली नाही. मात्र धर्म रक्षणाची जबाबदारी असलेले शंकराचार्य लढले. धार्मिक पातळीवर अनेक बाबी चुकीच्या होत असताना त्यावरून मोदींचे कान धरण्यापेक्षा त्यांच्याच गाडीत बसण्याची चढाओढ सुरू असल्याचे चित्र वेदनादायी असल्याचे दिंडे म्हणाले. भाजपचे हिंदूत्व नेहमीच बाजारू राहिल्याची खरपूस टीकाही दिंडे यांनी केली.

नाशिकची जागा शिवसेनेचीच

नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेचीच आहे. सध्या महाआघाडीची बोलणी सुरू असून, आतापर्यंत ही जागा शिवसेनेच्या बाजुने 80 टक्के आली आहे. लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होईल. राजकारणातील डावपेच लगेचच उघडे करता येणार नाही. मात्र, समोरून कोणता पक्ष येतो, त्याचा उमेदवार कोणता, याबाबी तपासून आमचीही रणनिती ठरवली जाणार, असे सुतोवाच दिंडे यांनी केले.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT