bharati pawar | bhaskar bhagare  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Lok Sabha Election Result : डॉ. भारती पवार यांना घरच्याच मतदारांनीच नाकारले! कळवणमध्ये मोठी पिछाडी

Bharti Pawar Kalwan assembly constituency : कळवण मतदार संघात डॉ. पवार यांचे दीर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नितीन पवार हे आमदार आहेत.

Sampat Devgire

Lok Sabha Election : दिंडोरी लोकसभा मतदार संघाचा निकाल अतिशय धक्कादायक लागला आहे. यामध्ये भाजपच्या विद्यामान खासदार, केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांना शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे भारती पवार यांना स्वतःच्या कळवण मतदारसंघात मोठी पीछेहाट झाली आहे.

या मतदारसंघात भास्कर भगरे यांना मताधिक्य मिळाले. ते दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. पराभूत भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर पवार या कळवण मतदारसंघातील आहेत. हा मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला मानला जातो.

कळवण मतदारसंघात डॉ. पवार यांचे दीर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नितीन पवार हे आमदार आहेत. या दोघांमध्ये प्रदीर्घ काळ कौटुंबिक दुरावा होता. या निवडणुकीत डॉ. पवार यांनी पुढाकार घेऊन पवार कुटुंबात मनोमिलन घडवून आणले होते. कळवण मतदारसंघातून मोठी आघाडी घेण्यासाठी हे मनोमिलन उपयुक्त ठरेल, असा राजकीय होरा होता.

मतदानाचे आकडेवारी हाती आल्यावर पवार कुटुंबीयांचे मनोमिलन मतदारांना मात्र आवडले नसावे, अशी स्थिती आहे. या विधानसभा मतदारसंघात डॉ. पवार यांना 56 हजार 461 मते आहेत. त्यांचे विरोधक आणि विजयी उमेदवार भगरे यांना एक लाख 14 हजार 134 मते आहेत. भगरेंना तब्बल 45 हजार मतांची भरघोस लीड कोळवण मतदारसंघातून मिळाले.

कळवण मतदारसंघ हा स्वर्गीय ए टी पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. उमेदवार डॉ. पवार या त्यांच्या सून आहेत. आमदार नितीन पवार हे ए टी पवार यांचे चिरंजीव आहेत. ए टी पवारांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे आहेत. दोन्ही गट एकत्र आल्याचे या निवडणुकीत दिसले. मात्र त्याचा प्रभाव मतदानात दिसला नाही. हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीवर हमखास परिणाम होईल असे बोलले जाते.

गावितांची भूमिका महत्त्वाची

'माकप'चे माजी आमदार जे पी गावित यांनी या मतदारसंघात उमेदवारी दाखल केली होती. मात्र राष्ट्रीय स्तरावर माकप इंडिया आघाडीचा भाग आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर गावित यांनी माघार घेतली.

गावित यांना मानणारे सुमारे 80 हजार मतदार येथे आहेत. हा इफेक्ट लोकसभेच्या मतदानात दिसून आला आहे. त्यामुळे डॉ. पवार यांना आपल्या घरच्या मतदारसंघानेच यंदा दूर लोटल्याचे दिसते. हा इफेक्ट आमदार नितीन पवार यांचीही झोप उडवू शकतो.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT