Bhaskar Bhagare News : भास्कर भगरेंच्या मताधिक्यावर घाला घालणारे  "बंडुराव" कोण?

Lok Sabha Nivadnuk Nikal : डॉक्टर भारती पवार यांनी टाकलेल्या जाळ्यात भास्कर भगरे अडकता अडकता वाचले
bhaskar bhagare bharati pawar
bhaskar bhagare bharati pawarsarkarnama
Published on
Updated on

Bhaskar Bhagare News: दिंडोरी लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे विजयी झाले. त्यांनी भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांचा दणदणीत पराभव केला.

या निवडणुकीत भाजपने सुरुवातीपासून विविध आव्हानांचा सामना केला. त्यावर मात करण्यासाठी त्यांनी काही राजकीय डावपेचही आखले. यातील एक डावपेच यशस्वी होता होता राहिला. भारती पवार यांच्या समर्थकांकडून बंडू भगरे सर नावाच्या एका तिसरी पास उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यात आला होता. हा बंडू भगरे सध्या प्रचंड चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला आहे.

https://www.youtube.com/watch?v=1Y3ZBT4kQGIया मतदारसंघात भाजपाच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ पवार यांना चार लाख तीन हजार ७१९ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या भास्कर भगरे यांना चार लाख ९९ हजार ६६१  मध्ये होती. भगरे हे ८७ हजार ९२२ मतांनी आघाडीवर होते. त्यांचा विजय घोषित होणे ही औपचारिकता राहिलेली आहे.

या सर्व मतदानामध्ये आश्चर्यकारकरीत्या कोणालाही माहीत नसलेल्या मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार भगरे सर यांच्याशी नाम साधर्म्य असलेले अपक्ष बंडू भगरे सर यांना ९५  हजार मते मिळाली. या भगरे यांनी खरे तर राष्ट्रवादीच्या भगरे यांचा पराभवच केला असता. परंतु हा पराभव होता होता राहिला. राष्ट्रवादीच्या भगरे यांच्या मताधिक्य पुढे हे बंडू भगरे ढाल बनवून पुढे उभे राहिले.

या निमित्ताने बंडू भगरे सर हे पहिल्या फेरीपासून चर्चेत राहिले. प्रत्यक्षात मतमोजणी सुरू असताना भगरे कुठेही दिसले नाही. भारतीय जनता पक्षाने केलेले हे षडयंत्र होते, असा आरोप राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी केला. त्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिंडोरी पोलीस ठाणे गाठून भगरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी मोठा तणाव देखील निर्माण झाला होता.

bhaskar bhagare bharati pawar
Pune Lok Sabha 2024 Election Winner: धंगेकर पॅटर्न फेल, पुण्याचा आखाडा अण्णांनी जिंकला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com