Narendra Modi Rally sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Narendra Modi Rally : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी तब्बल 1 लाख खुर्च्या, विखे पिता-पुत्राने लावली ताकद

Pradeep Pendhare

Nagar Loksabha : नगरमध्ये आज (मंगळवारी) महायुतीचे उमेदवार डाॅ. सुजय विखे-पाटील यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाविजय संकल्प सभा होत आहे. या सभेची मागील 15 दिवसांपासून विखे पिता-पुत्रांनी या सभेची जय्यत तयारी केली आहे. सभास्थळी तब्बल एक लाख खुर्च्या मांडण्यात आल्या आहेत.

नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजप BJP आणि शिवसेना महायुतीचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ही सभा विखे पिता- पुत्रांनी प्रतिष्ठिची केली आहे. सभेत कोणतीच उणीव राहू नये, यासाठी मंत्री विखे स्वतः गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचार सांभाळत सभास्थळाचे काम पाहात होते. सभा यशस्वी व्हावी यासाठी पूर्ण ताकद विखे पत्ता-पुत्रांनी लावली. सभेला लाखाच्यावर गर्दी होईल, असे नियोजन विखे पिता-पुत्रांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. डोक्यावर तळपणाऱ्या सूर्याची देखील तमा न बाळगता जथ्थेच्या जथ्थे सभास्थळाकडे जात होते. सभास्थळाकडे जाणारे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. महिला, युवक यांच्या हातामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट आउट होते. अबकी बार चौरासो पारच्या घोषणा या वेळी देण्यात येत होते.

छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवींचा पुतळा

सभेची जय्यद तयारी करण्यात आली आहे. व्यासपीठावर कोण उपस्थित असेल इथं पासून ते मोदींच्या बाजूंच्या खुर्च्यांवर कोण बसणार हे देखील निश्चित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सभेसाठी व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पूर्णाकृती पुतळा असणार आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT