Nagar Loksabha : पंतप्रधान मोदींच्या नगरच्या सभेची जय्यत तयारी, व्यासपीठावर असणार 'हे' दोन पुतळे

Narendra Modi : पंतप्रधानांच्या सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. हे व्यासपीठ भाजपच्या पक्ष चिन्हातील भगवा आणि हिरव्या रंगाची सांगड घातली आहे. व्यासपीठासमोरचा 'डी' झोनभोवती भगवा कपड्याचा अधिक वापर करण्यात आला आहे.
PM Narendra Modi
PM Narendra Modi Sarkarnama

Nagar Loksabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी (ता.7) नगर शहरात सभा होत आहे. या सभेची जोरदार तयारी सुरू आहे. मोदींच्या सभेसाठी विशेष तयारी भाजपकडून करण्यात आली आहे. व्यासपीठावर कोण उपस्थित असेल इथं पासून ते मोदींच्या बाजूंच्या खुर्च्यांवर कोण बसणार हे देखील निश्चित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सभेसाठी व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पूर्णाकृती पुतळा असणार आहे.

PM Narendra Modi
Maharashtra Political News : महायुती-महाविकास आघाडीमुळे वाढले उमेदवारांचे बळ अन् बजेटही...

पहिल्या दोन टप्प्यांमध्ये मतदानाचा टक्का घसरल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसकडून Congress देशभर आक्रमक प्रचार सुरू आहे. चारसौपारचा नारा संविधान बदलण्यासाठी भाजप देत असल्याचा मुद्दा काँग्रेस उपस्थित करत आहे. यावर पंतप्रधान नगरच्या सभेच्या काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधानांच्या सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. हे व्यासपीठ भाजपच्या BJP पक्ष चिन्हातील भगवा आणि हिरव्या रंगाची सांगड घातली आहे. व्यासपीठासमोरचा 'डी' झोनभोवती भगवा कपड्याचा अधिक वापर करण्यात आला आहे. तसेच मुख्य मंडपासह शेजारी दोन भव्य मंडप उभारण्यात आले आहे. प्रत्येक मंडपात 'एलईडी वाॅल' असतील. एक लाख लोक बसतील, असा मंडपाचा विस्तार असून तशी खुर्चीची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाढत्या तापमानामुळे मुख्य आणि बाजुच्या दोन्ही मंडपांमध्ये फॅन लावण्यात आले आहेत. तसेच शेकडो कुलर लावण्यात आलेत. यासाठी शेकडो जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. या मंडपाचे काम एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून पासून सुरू होते. सभेसाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित असणार आहे. या प्रमुख नेत्यांना व्यासपीठाच्या मागे ग्रीन टेंड उभारण्यात आले आहेत. तिथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भाजपचे प्रमुख नेते यांनाच प्रवेश असणार आहे. व्यासपीठासमोर अतिप्रमुख आणि प्रमुख पाहुण्यांच्या प्रवेशासाठी पास देण्यात आले आहे. तसेच या सभास्थळाला शेकडो अधिकारी आणि दोन हजारांपेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

नगरचा उल्लेख अहिल्यानगर करणार?

अहमदनगरच्या नामांतराचा ठराव प्रशासक महापालिकेने घेतला. यानंतर अहिल्यानगर नावाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी दिली गेली. यानंतर लोकसभेची निवडणूक जाहीर झाली. भाजप महायुतीच्या उमेदवारांनी त्यांच्या प्रचारात सुरूवातीपासून अहमदनगर पेक्षा अहिल्यानगर नावावर अधिक भर राहिला आहे. या नामांतराला मुस्लिम आणि सामाजिक संघटनांचा विरोध दर्शवला आहे. पंतप्रधान नगरचा उल्लेख अहमदनगर करतात की अहिल्यानगर याकडे देखील लक्ष असणार आहे.

(Edited By Roshan More)

PM Narendra Modi
Loksabha Election : कोल्हापूर, हातकणंगलेत 'अंडर करंट'चा झटका? 30 दिवसांच्या मेहनतीवर अवघ्या 36 तासांत पाणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com