Govinda At Trambakeshwar Nashik  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Lok Sabha Election Politics: उमेदवारी करण्याआधी अभिनेते गोविंदा त्र्यंबकेश्वराच्या चरणी लीन!

Sampat Devgire

Shivsena Shinde Group News : चित्रपट अभिनेता गोविंदा यांनी नुकताच शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. अभिनेता गोविंदा उत्तर मुंबई मतदार संघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. प्रदीर्घ काळानंतर गोविंदा राजकारणात उतरला आहे. Loksabha election Politics Actor Govinda At Trimbakeshwar

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात अभिनेता गोविंदा यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी शिवसेना (Shivsena) शिंदे गटाच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले होते. खुद्द अभिनेता गोविंदा मुंबईतील उत्तर मुंबई मतदार संघातून (Mumbai Uattar Matdar Sangh) उमेदवारी करण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून त्यांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केलेली आहे. गोविंदा प्रदीर्घकाळ राजकारणापासून अलिप्त होते. त्यानंतर त्यांनी निवडणुकीच् काळातच राजकारणात भाग घेतला आहे. त्यामुळे ते राज्याच्या राजकरणात चर्चेचा विषय बनत आहेत.

लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी त्यांनी आज सकाळी ज्योतिर्लिंग त्रिंबकेश्वर (Trimbakeshwar Mandir) मंदिरात दर्शन घेऊन अभिषेक केला. त्यांच्यासोबत मुलगा यश आणि ज्येष्ठ बंधू कीर्ती देखील होते. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आणि अध्यक्ष नितीन जीवने, कैलास घुले, रूपाली भुतडा, पुरुषोत्तम कडलग, सत्यप्रिय शुक्ल आणि स्वप्निल शेलार (Swapnil Shelar) यावेळी उपस्थित होते. अभिनेता गोविंदा मंदिरात दर्शनाला आल्याने अनेक भाविकांनी सेल्फी घेण्यासाठी त्यांना गराडा घातला होता. गोविंदा यांनी अभिषेक केल्यानंतर त्र्यंबकेश्वरला काय साकडे घातले हे मात्र समजू शकले नाही.

अभिनेता गोविंदा (Govinda) यांनी 2004 मध्ये काँग्रेस (Congress) पक्षाच्या तिकिटावर उत्तर मुंबई मतदार संघातून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा पराभव केला होता. अभिनेता गोविंदा यांची ती निवडणूक राम नाईक यांनी आपल्या आत्मचरित्रात केलेल्या उल्लेखामुळे वादग्रस्त ठरली होती. अभिनेता गोविंदा यांनी निवडणूक जिंकण्यासाठी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम यांची मदत घेतल्याचा आरोप केला जातो. अभिनेता गोविंदा याने 2004 ची निवडणूक जिंकल्यानंतर राजकारणाला राम राम ठोकला होता.

Edited By : Rashmi Mane

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT