Nitin Gadkari  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nitin Gadkari : 'लग्न आमचं झालं, मुलं आम्हाला झाली अन् लाडू..'; नितीन गडकरींची 'ही' शेलकी टोलेबाजी कोणाला?

Nitin Gadkari criticizes MVA candidate in Ahilyanagar: भाजप महायुतीचे उमेदवारासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची 'मविआ'च्या उमेदवारावर शेलक्या शब्दात टीका.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना चांगलाच खणखणीत टोला लगावलाय.

महामार्गाचे श्रेय घेण्यावरून गडकरी यांनी आमदार पवारांवर संतापले. 'हे म्हणजे लग्न आमचं झालं, मुलं आम्हाला झाली आणि लाडू भलतंच वाटतंय', अशा शेलक्या टोलेबाजीने गडकरी यांनी पवारांना सुनावले.

भाजप (BJP) नेते नितीन गडकरी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अहिल्यानगरमध्ये सभा झाल्या. कर्जत-जामखेडमध्ये त्यांची भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांच्यासाठी सभा झाली. यात त्यांनी विरोधी उमेदवार आमदार रोहित पवार यांच्या श्रेयवादावर चांगलेच सुनावले.

कर्जत-जामखेड मतदारसंघातून नगर-सोलापूर आणि आढळगाव-जामखेड महामार्ग गेला आहे. यावर आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबतचा फोटो सोशल मीडियावर टाकत पाठपुरावा केल्याचा दावा केला होता. राम शिंदेंनी या श्रेयवादाचे उल्लेख भाषणा करत नितीन गडकरी यांचे लक्ष वेधले. नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात त्याची दखल घेत, "सरकार आमचे, रस्त्यासाठी निधी आम्ही दिला. हे म्हणजे लग्न आमच झालं, मुलं आम्हाला झाली आणि लाडू भलतेच वाटतंय", असे म्हणत रोहित पवारांना टोला लगावला.

भलतेच लाडू वाटतात

नितीन गडकरी म्हणाले, "कर्जत-जामखेडची निवडणूक प्रा. राम शिंदे यांच्या भवितव्याची निवडणूक नसून ती येथील मतदारांच्या भविष्याची निवडणूक आहे. भाजप सबका साथ, सबका प्रयास, सबका विकास आणि सबका विश्वास म्हणून देशात काम करीत आहे". सरकार आमचे, रस्त्यासाठी निधी आम्ही दिला. आणि इकडे भलतेच लाडू वाटतात".

संविधानाविषयी अपप्रचार

'निवडणूक आणि प्रचाराच्या काळात अनेक नेते आश्वासनाची खैरात करण्यासाठी येतात. मात्र आपण आजपर्यंत राजकारणात 'जो बोलता हु, वो डंके की चोट पर 100 टक्का करता हु', असे हिंदीत म्हणत उपस्थितांना आपल्या विकास कार्याची ग्वाही दिली. भाजप निवडून आल्यास संविधान बदलणार हा अपप्रचार काँग्रेस मित्रपक्ष करीत आहे. वास्तविक पाहता यांनीच इंदिरा गांधींच्या काळात संविधान बदलण्याचे पाप केलं आहे, भाजप मुस्लिमांना भीती दाखवत आणि त्यांना घाबरवून त्यांची मते घेण्याचा केविलवाणा प्रयत्न काँग्रेस करीत आहे', असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

जातीवर मते मागणे ही शोकांतिका

'कर्जत-जामखेड मतदारसंघात रस्त्यासाठी एकूण 2 हजार 200 कोटींचा निधी नगर-करमाळा-सोलापूर, आढळगाव-जामखेड, जामखेड-सौताडा, जामखेड-नगर मार्गासाठी दिला. यातील काही कामे पूर्णत्वास गेली असून काही मार्ग प्रगतीपथावर आहे. विकासकामावर विश्वास नसला की लोकप्रतिनिधी जातीवर मते मागतात ही राजकीय शोकांतिका आहे', असेही नितीन गडकरी यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT