Balasaheb Thorat 1 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat : 70 हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप, त्याच नेत्याकडे तिजोरीच्या चाव्या; थोरातांचा भाजप अन् अजितदादांवर निशाणा

Congress Balasaheb Thorat BJP Ajit Pawar Rahuri constituency Ahilyanagar : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुरीतील सभेत भाजपसह अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपातून जोरदार टीका केली.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाजपसह अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. बाळासाहेब थोरातांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आपल्या टीकेची धार वाढवल्याने सत्ताधारी देखील 'बॅकफूट'वर गेलेत.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांच्यावर 70 हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप केला. तो नेता पुढे त्यांच्याकडे गेला आणि भ्रष्टाचारच मिटून गेला. या भाजपने यावर अधिकच कढी केली अन् दरोडेखोर व भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्याच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या दिल्या", असा घणाघात बाळासाहेब थोरात यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केला.

बाळासाहेब थोरात यांची राहुरी इथं सभा झाली. या सभेत त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. भाजपवर बोलताना थोरात म्हणाले, "भाजप सरकारने सत्तेत येण्यासाठी वारेमाप आश्वासने दिली. शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्न करण्याचे आश्वासन दिले. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होणार होते, तर दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देणार होते. हा सर्व निवडणुकीचा जुमला होता. आता या भूलथापांना जनता, मतदार विधानसभा निवडणुकीत निश्चितच जागा दाखवतील".

भाजप, अजितदादांवर टीका

भ्रष्टाचारावर बोलताना थोरात यांनी भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल चढवला. "आमदार फोडण्यासाठी त्यांनी 50 खोके दिले. मोदी म्हणाले 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार एका नेत्यावर केला. हा नेता त्यांच्याकडे गेला आणि भ्रष्टाचारच मिटून गेला. दरोडेखोर आणि भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्याच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या दिल्या. ज्याची चौकशी सुरू आहे, ते तिकडे गेल्यानंतर चौकशी थांबली. यांच्या फाईली देखील गायब केल्या गेल्या", असा घणाघात थोरात यांनी केला.

भाजपकडून हिंदुत्वाची बदनामी

"पक्ष फोडून सरकार स्थापन केले. हे सरकार भ्रष्टाचाराच्या जीवावर स्थापन झाले. धर्माधर्मात भेद निर्माण करण्यास निघालेले हे सरकार जाती-जातीत तेढ निर्माण करत आहे. विकासाच्या मुद्द्यावर बोलायला तयार नाही. जनतेला भुलथापा देऊन मते मिळविण्याचे दिवस संपले आहे. जनता सुज्ञ झाली असून महायुतीच्या उमेदवारांची मोठी पंचाईत झाली आहे. परिणामी पराभव समोर दिसत असल्याने विरोधकांनी आता हिंदुत्वाच्या गोष्टी सुरू केल्यात. हिंदुत्वला बदनाम करीत भाजप मित्र पक्षाची मंडळीचा स्वार्थ कधीच पूर्ण होणार नाही", असे आमदार थोरात यांनी सांगितले.

कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा

राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. एका आमदाराने पोलिस ठाण्यामध्ये जाऊन गोळीबार केला. काही धन दांडग्यांनी लोकांच्या अंगावर गाड्या घातल्या, महिलांच्या अत्याचाराच्या घटना दैनंदिन घडत आहेत, छत्रपतींचा अपमान हे सत्ताधारी महाराष्ट्रात करत आहे. हे सरकार उलथवून टाकण्याची वेळ आल्याचे सांगून बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या जाहिरनाम्यावर भाष्य केले. शेतकर्‍यांना तीन लाखाच्या कर्जमाफीसह महिलांना दर महिना तीन हजार रुपये, कर्जफेड केलेल्या शेतकर्‍यांना 50 हजार अनुदान, आरोग्य खर्चासाठी 25 लक्ष, बेरोजगार तरुणांना चार हजार महिना भत्ता', अशा योजना राबविणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT