Priyanka Gandhi On BJP : 'मोदीजी सुन लीजिए, बाळासाहेब ठाकरे का नाम'; प्रियांका गांधी यांचा शिर्डीतून भाजपवर हल्लाबोल

Congress Priyanka Gandhi Shirdi Ahilyanagar BJP PM Narendra Modi mahayuti government : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी शिर्डीतील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली.
Priyanka Gandhi
Priyanka GandhiSarkarnama
Published on
Updated on

Shirdi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीतील काँग्रेसबरोबर गेल्यावरून अनेकदा डिवचलं होते.

काँग्रेसचे नेते बाळासाहेब ठाकरे यांचे नाव सुद्धा घेऊ शकत नाही. त्यांना ते सन्मान देत नाहीत, असे म्हणून मोदींनी राहुल गांधी यांच्यावर हल्ला करत होते. मोदींच्या या टीकाले काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी साईबाबांच्या शिर्डीतून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रियांका गांधी म्हणाल्या, "मैं राहुलजी की बहन हूं, मैं कहती हूं की, मोदीजी सुन लीजिए, बाळासाहेब ठाकरे नाम सुन लीजिए. आमची विचारधारा वेगळी होती. आमची राजकीय वाट्या वेगळ्या होत्या. परंतु हिंदूहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस (Congress) नेते, राहुल गांधी किंवा काँग्रेसमधील आताच्या नेत्यांनी कोणीच छत्रपत्रती शिवाजी महाराज यांचा अपमान केला नाही आणि सहन केला नाही, असा टोला प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

Priyanka Gandhi
MP Supriya Sule : संगत लय वाईट, देवाभाऊ त्यातूनच बिघडले; खासदार सुळेंचा अजितदादांना टोला

जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुलें ॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥ जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग म्हणत प्रियांका गांधी यांनी त्यांच्या भाषणाची सुरवात करत छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करणाऱ्या भाजपवर तुटून पडल्या. काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, युवा नेत्या जयश्री थोरात, शिर्डीच्या उमेदवार प्रभावती घोगरे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, हेमंत ओगले आदी उपस्थित होते.

Priyanka Gandhi
Uddhav Thackeray interview: 'माझी सत्ता पाडणे हा 'सत्ता जिहाद' होता'; उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा ...पाहा VIDEO

छत्रपतींचा अपमान सहन करणार नाही

'या महाराष्ट्रात, देशाला गौरव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होत आहे. सर्वसामान्य जनतेचा अपमान केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले जाते, परंतु सन्मान केला जात नाही. सात वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा शिलान्यास केला, नंतर गपचूप काम थांबवले. संसदेच्या बाहेरील प्रतिमा हटवली. सिंधुदुर्गमधील पुतळा कोसळला. या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला. अपमानांचा हा पाढाच सुरू आहे', असा घणाघात प्रियांका गांधी यांनी केला.

मोदी, शाह यांना खुलं आव्हान

प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना आव्हान दिले. "जात गणना करणार असे जाहीर सांगावे. आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादा हटवणार. परंतु राहुल गांधी आरक्षणाविरोधात एवढचं ते सांगत आहे. कन्याकुमारी से जम्मू-काश्मीर आणि मुंबई से मणिपूरपर्यंत भारत जोडो यात्रा केली. न्याय मागितला. पण, मोदी आणि शाह व्यासपीठावर खोट बोलत राहिले. राहुल गांधी यांना मोदी आणि शाह घाबरतात", असा खणखणीत टोला प्रियांका गांधी यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com