Radhakrishna Vikhe Patil, Prajakt Tanpure  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nagpur Winter Session : राष्ट्रवादीच्या आमदाराने एक-एक मुद्दे मांडले, पालकमंत्र्यासह आरोग्यमंत्र्यांचे वाभाडेच काढले

Prajakt Tanpure Slams Radhakrishna Vikhe Patil Over Rahuri Gramin Rugnalaya : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मंत्री विखे पाटलांसह तानाजी सावंत यांच्यावरही निशाणा साधला...

Pradeep Pendhare

Ahmednagar Politics Latest News : राहुरी ग्रामीण रुग्णालयातील प्रश्नांवर माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला. 'पालकमंत्री कधी कोणती संकल्पना राबवतील, तर आरोग्य व्यवस्थेचे काय होणार, असा प्रश्न करत आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा', अशी मागणी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सभागृहात केली.

"राहुरीतील ग्रामीण रुग्णालयाला नगरपालिकेने शहरात जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेबाबत अनेक अडचणी होत्या. दोन-तीन वर्षांत वेळोवेळी बैठका घेऊन जागेचा वाद लोकप्रतिनिधी म्हणून संपवला. आता रुग्णालय बांधायचे, तर पालकमंत्री यांनी नवीनच संकल्पना राबवून ग्रामीण रुग्णालय बाहेर कुठेतरी नेण्याचा निर्णय घेतला. हे रुग्णालय गावाबाहेर पाच किलोमीटरवर नेण्यात येणार आहे. ही कार्यवाही करताना स्थानिक आमदारांना कुठेही विश्वासात घेतलेले नाही. काय अन् कशाप्रकारे आरोग्य व्यवस्था होणार आहे, याची मोठी काळजी सर्वसामान्यांना लागली आहे. आरोग्यमंत्र्यांनी जनाची-मनाची ठेवून खरंच राजीनामा दिला पाहिजे. याठिकाणी राज्याला कार्यक्षम आरोग्यमंत्री मिळाला पाहिजे, असेही तनपुरे म्हणाले.

राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रश्नावर पावसाळी अधिवेशनातही आमदार तनपुरे यांनी सरकारचे लक्ष वेधले होते. त्यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी राहुरी शहरात रुग्णालयासाठी जागा उपलब्ध होत असले, तर रुग्णालय गावाबाहेर नेण्याचा विषय संपला. अधिवेशन काळात बैठक घेऊन यावर मार्ग काढू, असे आश्वासन दिले होते. परंतु राहुरी ग्रामीण रुग्णालयावर तोडगा निघाला नाही. आमदार तनपुरे यांनी हा मुद्दा पुन्हा नागपूर हिवाळी अधिवेशनात उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले.

राहुरीतील बसस्थानक आणि रुग्णालयाच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या काळापासून आमदार तनपुरे पाठपुरावा करत आहेत. परंतु राज्यात सत्तांतर झाले आणि प्रशासनात नवीन धोरण सुरू झाले. महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेल्या कामांना स्थगिती मिळाली. यात राहुरीतील हा मुलभूत प्रश्न तसाच राहिला.

शिर्डी-शनिशिंगणापूर हे जागतिक तीर्थस्थळ आहेत. या दोन्ही तीर्थस्थळाचा मध्यवर्ती भाग म्हणून राहुरी आहे. रस्त्यांचा विकास वेगाने होत आहे. तसेच अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे राहुरी शहरात अद्यावत असे सरकारी रुग्णालय झाल्यास अपघातग्रस्तांना त्याचा फायदा होईल. अनेकांचे जीव वाचतील. तसेच ग्रामीण रुग्णालय शहरात निर्माण झाल्यास त्याचा स्थानिकांना साथींच्या आजारात उपचारासाठी फायदा होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

...तर पोलीस निरीक्षकांना निलंबित केले असते

राहुरीत चोरीचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरीला जाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. राहुरीतील चडेगाव येथील तब्बल 30 विद्युत मोटारी चोरीला गेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरीला जाणे म्हणजे, त्यांच्यावरील संकटात अधिक भर पडण्यासारखे आहे. त्यांचे दुःख आपण समजू शकणार नाही. परंतु राहुरी पोलिसांना त्यांचे काही देणेघेणे नाही. राहुरीचे पोलीस निरीक्षक निर्लज्जपणे शेतकरी काहीतरी वेगळे बोलतात, असे विधान भर सभेत करतात. पोलीस प्रशासनाला नागरी सुरक्षितेविषयी काही गांभीर्य राहिलेले नाही. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असते, तर अशा पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित केले असते, असा हल्लाबोल करत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सभागृहात सरकारचे लक्ष वेधले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT