Ahmednagar Political News: राज्याचे महसूल तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी संगमनेर तालुक्यात जोरदार टोलेबाजी केली. मंत्री विखे यांचा हा सर्व रोख माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे होता. "कोणाला जलनायक व्हायचे आहे, तर कुणाला खलनायक, आमची काहीच तक्रार नाही", असा टोला मंत्री विखे यांनी आमदार थोरातांचे नाव न घेता लगावला.
निळवंडे येथे विकसित भारत संकल्प यात्रा आणि निळवंडे पाण्याचे पुजन मंत्री विखे आणि वारकरी नामदेव पवार यांच्या हस्ते झाले. सरपंच शशिकला पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. जेष्ठ नेते बापूसाहेब गुळवे, भाजपचे तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, शहराध्यक्ष श्रीराम गणपुले उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मंत्री विखे म्हणाले, "अनेक वर्षांपासून ठेकेदारांनी तालुका कब्जा घेतला आहे. ठेकेदारांच्या टोळ्यांनीच राजकीय पद घेवून निर्माण केलेली दहशत आता सामान्य माणसं संपवतील. या भागात निळवंडे धरणाचे पाणी आले, आता रोजगार उपलब्ध करुन देण्याचे उदिष्ट आहे. कोणाला जलनायक व्हायचे, कोणाला खलनायक व्हायचे, त्यांनी जरुर व्हावे पण कालव्यांची कामे रखडवून तुम्हाला कोणती निर्मिती साध्य करायची होती, हे सुध्दा एकदा जनतेला सांगा".
लोकांवर टीका करण्यात वेळ घालविण्यापेक्षा आपल्या कामाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचा. योजना केंद्र सरकारच्या असतात. पण श्रेय दुसरेच घेतात ही परिस्थिती या तालुक्याची आहे. वर्षानुवर्षे ज्या पाण्याची प्रतिक्षा आपल्याला होती, त्या निळवंडे धरणाच्या कामासाठी महायुतीचे सरकार सत्तेवर यावे लागले.
यासर्व कामांचे श्रेय कोणाला घ्यायचे ते घेवू द्या, कोणाला जलनायक, खलनायक व्हायचे ते होवू द्या. त्याचे आपल्याला काही देणे घेणे नाही. निळवंडे धरणाच्या कामाबाबत झालेले राजकारण आता पाण्यात वाहून गेल्याचे मंत्री विखे यांनी म्हटले.
राज्यात ट्रिपल इंजिन सरकार आहे. निधीची कमतरता भासणार नाही. कोणी कितीही अडथळे निर्माण केले तरी, या संगमनेर तालुक्याची विकास प्रक्रिया आता थांबणार नाही. हा तालुका केवळ ठेकेदारांच्या दावणीला बांधला गेला आहे.
संगमनेर तालुक्याचा कब्जा ठेकेदारांनी घेतला होता. वाळू स्पलायर्स तेच, रस्त्याला तेच, शौचालय बांधायला तेच, पुढारी तेच, कारखाना संचालक तेच, जिल्हा परिषद सदस्य तेच, त्यामुळे सर्वसामान्यांचा आवाज नाही. ठेकेदारांच्या टोळ्यांनी निर्माण केलेली दहशत सामान्य जनताच आता मोडून काढेल, असा सूचक इशारा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी यावेळी दिला.
मागील अडीच वर्षात निळवंडे कालव्याची कामे जाणीवपूर्वक यांनीच रखडविली होती. या कालव्यांच्या कामाचा ठेका कोणाकडे होता हे जनता जाणून आहे. परंतु केवळ अडवणूक करण्याच्या कारणाने ठेकेदार संपूर्ण विभागालाच वेठीस धरीत होता.
मात्र, सरकार बदलल्यानंतर ही कामे सुरु झाली. कालव्यांची कामे रोखून तुम्हाला कोणती निर्मिती साध्य करायची होती हे सुध्दा निळवंड्याचे श्रेय घेणाऱ्यांनी सांगावे, असेही मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले.
(Edited by- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.