Maharashtra BJP on Uddhav Thackeray  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP On Uddhav Thackeray: भाजपनं करुन दिली ठाकरेंना बहिणाबाईंच्या त्या ओळीची आठवण; "इमानाले इसरला त्याले नेक..,

Maharashtra BJP on Uddhav Thackeray : ठाकरेंनी खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेचा आधार घेऊन विरोधकांवर हल्लाबोल केला.

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Politics News: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल (रविवार ) पाचोरा (जि.जळगाव) येथे जाहीर सभा झाली.

ठाकरेंनी या सभेत भाजप नेते, मुख्यमंत्री एकनाश शिंदे, शिंदे गटातील नेत्यांचा समाचार घेतला. यावेळी ठाकरेंनी खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेचा आधार घेऊन विरोधकांवर हल्लाबोल केला.

या सभेत उद्धव ठाकरेंनी "जल्म्दात्याले भोवला त्याले लेक म्हणू नही..," असं म्हणत ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. परंतु ते कवितेच्या पुढील ओळी विसरले होते. त्याचीच आठवण भाजपने करुन दिली. आपल्या ट्वीटर हॅण्डलवरून भाजपने उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.

भाजपने केलेल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे की, उद्धवजी, तुम्ही पाचोऱ्यात आले. महाकवयित्री बहिणाबाई यांची कविता ऐकवली. पण तुमचं सगळंच सोयीस्कर आहे. ही कविताही तुम्ही तुमच्या प्रमाणे ऐकवली, अगदी सोयीस्कर!, “जल्म्दात्याले भोवला त्याले लेक म्हणू नही..” इतकीच एक ओळ तुम्ही जनतेला ऐकवली पण तुम्ही सोयीस्कर गाळलेली पुढची ओळ अशी आहे : ‘इमानाले इसरला त्याले नेक म्हणू नही. जल्म्दात्याले भोवला त्याले लेक म्हणू नही’, ‘ज्याच्यामधी नाही भाव त्याले भक्ती म्हनु नही, ज्याच्यामधी नाही चेव त्याले शक्ती म्हणू नही’, ठरवून फक्त कवितेच्या ओळी गाळता येतात उद्धवजी, जनतेला विश्वासात घेण्यासाठी नियत साफ लागते, असं देखील भाजपने म्हटलं आहे.

मोदींवर टीका करताना ठाकरे म्हणाले, "आमचे सरकार देणार आहे, घेणारे नाही. मी घरी बसून सरकार चालविले. मी घरी बसून जे करू शकलो ते तुम्ही वणवण करून करू शकणार नाही. मी घरी बसून केले म्हणून ही माणसं आज आलीत. घराणेशाहीवर तुम्ही बोलताय ना, मी फकीर आहे. असे सांगत आहेत. तुमच्या मागे पुढे कोणी नाही, अरे कधीतरी झोळी लटकवून निघून जाल, माझ्या जनतेच्या हाती कटोरा देऊन, म्हणून घराणे चांगले लागले,"

उद्धव ठाकरे म्हणाले, "काही लोक लाचारी म्हणून तुमच्याकडे येतात. मग तुम्ही काय त्यांच्यावर गोमूत्र शिंपडता. भाजपला इतर कुठलेही पक्ष नको फक्त भाजप ठेवायची आहे. २०१४ मध्ये युती तुटली तेव्हा एकनाथ खडसे निरोप घेऊन आले होते. भाजपला खडसेही नकोसे झाले आहेत. ईडी म्हणजे सत्यनारायणाची पुजाच झाली आहे. राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबाला सत्यनारायणाच्या पुजेचा प्रसाद घ्यायला बोलावतात. जे जे भाजपसोबत जात नाहीत त्यांच्यामागे चौकशीचा सासेमिरा लावला जातो,"

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT