Eknath Shinde On Uddhav Thackeray: शिवसेना कुणाची हे सांगायला पाकिस्तानच्या प्रमाणपत्राची गरज ? ; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

CM Eknath shinde Slam Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाला मोतीबिंदू झाला आहे.
Uddhav Thackeray Vs  Eknath Shinde
Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSarkarnama

Shivsena News : ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल (सोमवारी) पाचोरा येथे सभा झाली.

या सभेसाठी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत, ठाकरे गटाच्या फायर बॅड नेत्या सुषमा अंधारे उपस्थित होत्या. यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली .

उद्धव ठाकरे म्हणाले, "काही लोक लाचारी म्हणून तुमच्याकडे येतात. मग तुम्ही काय त्यांच्यावर गोमूत्र शिंपडता. भाजपला इतर कुठलेही पक्ष नको फक्त भाजप ठेवायची आहे. २०१४ मध्ये युती तुटली तेव्हा एकनाथ खडसे निरोप घेऊन आले होते. भाजपला खडसेही नकोसे झाले होते. ईडी म्हणजे सत्यनारायणाची पुजाच झाली आहे. राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबाला सत्यनारायणाच्या पुजेचा प्रसाद घ्यायला बोलावतात. जे जे भाजपसोबत जात नाहीत त्यांच्यामागे चौकशीचा सासेमिरा लावला जातो,"

Uddhav Thackeray Vs  Eknath Shinde
JDS News : कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडली ; रुग्णालयात दाखल

यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, "पाकिस्तानला विचारलं तरी पाकिस्तान सांगेल शिवसेना कोणाची. मात्र निवडणूक आयोगाला मोतीबिंदू झाला आहे," असा टोला उद्धव ठाकरेंनी सभेत लगावला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

"शिवसेना कुणाची हे सांगायला तुम्हाला पाकिस्तानचे सर्टिफिकेट लागते, हे दुदैव आहे," अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपने जाहीर करावे ते मिंधेच्या नेतृत्वात लढणार आहेत का? तुम्ही मोदी आणि चोरलेले धनुष्यबाण घेऊन या मी माझे नाव घेऊन येतो. आग दिसतेय म्हणून निवडणुका घेण्याची हिंमत होत नाही. आता निवडणुका लावा मी तयार आहे. मशालाची धग, अशी लावू की तुमचे सिंहासन हलेल.

Uddhav Thackeray Vs  Eknath Shinde
Amritpal Singh News : मुख्यमंत्री मान म्हणाले, " १८ मार्च रोजीच त्याला पकडले असते, ; पोलिसांनी गोळीबार..

या सभेवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार पाटील यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. आमदार गुलाबराव पाटील यांनी सभेत घुसण्याचे वक्तव्य केले होते. त्यावर उद्धव ठाकरेंनी सभेत गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला.

"सभेत घुसू म्हणाले होते. अशा घुशी आम्ही खूप बघितल्या आहेत. अशा घुशींना निवडणुकीत हाणूनच पाडू," असा टोला उद्धव ठाकरे यांनी आमदार गुलाबराव पाटील यांना जळगाव येथील सभेत लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com