President Droupadi Murmu & Vice President Jagdish Dhankad.
President Droupadi Murmu & Vice President Jagdish Dhankad. 
उत्तर महाराष्ट्र

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची निवड हा लोकशाहीचा सन्मान!

Sampat Devgire

मुंबई : द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) देशाच्या महामहीम राष्ट्रपती झाल्या. उपराष्ट्रपतीपदी जगदीश धनकड (Vice President Jagdish Dhankad) यांची निवड झाली. विधानपरिषदेत त्यांचे अभिनंदन करणारा ठराव एकमताने झाला. संविधान सर्वांना समानतेची संधी देते. लोकशाही तळागाळातील घटकांना लोकप्रतिनिधीत्व देते. त्यामुळे राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींची निवड म्हणजे संविधान, लोकशाही आणि महिलांचा सन्मान आहे, असे यावेळी सभागडह नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Maharashtra Council congratulate President & Vice president today)

विधान परिषदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहनेते यांनी हा अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची निवड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यासाठी त्यांचे देखील अभिनंदन केले.

देशाच्या महामहीम राष्ट्रपती झाल्या, त्या देखील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ही निवड झाली. हा देश, महिला व आदिवासी व लोकशाही यांच्या निमित्ताने हा सन्मान होतो आहे. हा अतिशय सुंदर प्रसंग आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ते पुढे म्हणाले, यानिमित्ताने लोकशाहीत तळागाळातील घटकांना लोकप्रतिनिधीत्वाची संधी मिळते. संविधानाने सामान्यांना, महिलांना सर्वोच्च पदावर जाण्याची संधी मिळते. त्यानिमित्ताने संविधानातील या अतिशय सुंदर विलोभनिय व सर्व भारतीयांना प्रेरणा देणारा आहे.

यावेळी सभापती नीलमताई गो-हे, विरोधी पक्षनेते, सदस्य कपिल पाटील यांनी या प्रस्तावावर भाष्य केले. एकमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT