BJP News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra Drought: भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली सरकारची कोंडी; पाथर्डीचा दुष्काळी तालुक्यात समावेश करण्याची मागणी

Cabinet Meeting : राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय झाला

Ganesh Thombare

प्रदीप पेंढारे-

Ahmednagar News : राज्यातील काही भागात पावसाने कमी प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांत दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या अनुषंगानेच मंगळवारी राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मात्र, आता ज्या तालुक्यात पाऊस कमी पडला, पण सरकारने दुष्काळ जाहीर केलेला नाही, अशा तालुक्यातील नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

अहमदनगरमधील पाथर्डी तालुका दुष्काळी जाहीर करावा, यासाठी भाजप कार्यकर्त्यांनीच महायुती सरकारची कोंडी केली आहे. पाथर्डी तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश करण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात यंदा कमी पाऊस झाला आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने बैठकीत पीक-पाणी परिस्थितीचा आढावा घेतला. यात राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय झाला. दुष्काळी तालुक्यात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याबरोबरच जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, पीक कर्जाच्या वसुलीत स्थगिती, कृषिपंपाच्या चालू वीजबिलात 33 टक्क्यापर्यंत सूट, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ अशा सवलती लागू करण्यासंदर्भात सरकारने हिरवा कंदील दिला आहे.

नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. राज्य सरकारचे याकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. दुष्काळी तालुक्यांमध्ये पाथर्डी तालुक्याचा समावेश करण्याची मागणी राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यानंतर भाजपचे पाथर्डी तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले, "पाथर्डी तालुका दुष्काळी आहे. पाटाचे पाणी नाही. तलाव नाही. सुमारे 20 टँकरद्वारे पाथर्डीतील वाड्या-वस्त्यांवर पाणीपुरवठा सुरू आहे. जनावरांना चारा नाही. पीक-पाण्याची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक्यांमध्ये पाथर्डीचा समावेश झालाच पाहिजे, यासाठी पाथर्डी तालुक्यातील शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांनी निवेदन दिले".

दरम्यान, यंदा पावसात एकूण 13.4 टक्के घट नोंदवण्यात आली आहे. रब्बी पेरण्याही होतील की नाही अशी परिस्थिती आहे. आतपर्यंत फक्त 12 टक्के पेरण्या राज्यात झाल्या आहेत. त्यामुळे आता राज्य सरकार पाथर्डी तालुक्याबाबत काही निर्णय घेतं का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT