Maratha Reservation: नगरमध्येही मंत्री, आमदार, खासदारांच्या घरासह पक्ष कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त

Maratha Andolan : नगर जिल्ह्यात दीडशेहून अधिक गावात राजकीय नेत्यांना गाव बंदीचे फलक लागले आहेत.
Police Security
Police SecuritySarkarnama
Published on
Updated on

प्रदीप पेंढारे-

Ahmednagar News : मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर नगर शहरासह जिल्ह्यात असलेले मंत्री, आमदार, खासदार आणि राजकीय नेत्यांची संपर्क कार्यालय आणि घरी पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे.

नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे नगर शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालयातील संपर्क कार्यालय येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याशिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांचे आयुर्वेदिक चौकात असलेल्या संपर्क कार्यालयाला पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे.

Police Security
Bhanudas Murkute News : भानुदास मुरकुटेंची 'या'साठी मंत्री विखे,थोरातांकडे आयुष्यभर पाणी भरण्याची तयारी!

आमदार निलेश लंके यांचे बुरुडगाव रोडवर असलेले संपर्क कार्यालय येथेही पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. याशिवाय नगर शहरात असलेल्या गांधी मैदानातील भाजपचे पक्ष कार्यालय, चितळे रोडवरील काँग्रेसचे पक्ष कार्यालय या ठिकाणीही पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे.

नगर शहरातील शिवसेना भवन पोलीस बंदोबस्ताला अपवाद ठरले. तसेच नगर जिल्ह्यातील आमदार आणि राजकीय नेत्यांच्या संपर्क कार्यालयाची माहिती घेत पोलिसांनी तिथेही बंदोबस्त ठेवला होता. नगर जिल्ह्यात दीडशेहून अधिक गावात राजकीय नेत्यांना गाव बंदीचे फलक लागले आहेत.

दरम्यान, नगर शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने आज रात्री कॅण्डल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद येथील छत्रपती शिवाजी महाराज ते दिल्ली दरवाजापर्यंतचा हा कॅन्डल मार्च काढला जाणार आहे.

भाजपचे कर्डिले यांचा रास्ता रोको

मराठा आरक्षणसाठी अहिंसेच्या मार्गाने लढा देत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी आज नगर-छत्रपती संभाजीनगर रोडवर सकाळीच रास्ता रोको केला. या आंदोलनात तरुण मोठ्या संख्येने सहभागी होते. यामुळे वाहतूक कोंडीही झाली.

ग्रामपंचायत निवडणुकीपासून नेते दूर

नगर जिल्ह्यात 194 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मराठा आरक्षणाचा आंदोलनाचा परिणाम या निवडणुकीवर झालेला दिसतो. राजकीय नेत्यांनी निवडणूक प्रचारापासून दूर राहणे पसंत केले. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात जोर दिसत नाही. निवडणुकीसाठी पॅनल तयार झाले असते, तरी पॅनल प्रमुख आणि उमेदवार प्रचार रेटत आहेत.

Edited By- Ganesh Thombare

Police Security
Bhanudas Murkute News : भानुदास मुरकुटेंची 'या'साठी मंत्री विखे,थोरातांकडे आयुष्यभर पाणी भरण्याची तयारी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com