Socialist leaders at Dhule Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sambhaji Bhide Controversy : भिडेंसारख्या प्रवृत्तींना त्वरित वेसण घाला!

Sampat Devgire

Dhule News : विविध समाजवादी संघटना आणि कार्यकर्त्यांनी भिडे यांच्या वक्तव्याने अपार दुख झाल्याची भावना व्यक्त केली आहे. समाजातील एक घटक जगातील महान विभूती असलेल्या महात्मा गांधी यांची काहीही माहिती नसताना आंधळेपणाने संभाजी भिडे यांसारख्या वृत्तीचे समर्थन करते हा सामाजिक ऱ्हास असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. (Sambhaji Bhide case is a sign of social decay)

विविध समाजवादी तसेच गांधीवादी (Mahatma Gandhi) संघटनांनी धुळे (Dhule) येथे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांचा निषेध केला. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. कारवाईची मागणी केली.

महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या शिवप्रतिष्ठान हिंदु्स्थान संस्थेचे संस्थापक मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांचा निषेध करत अशा लोकांना सरकारने ताबडतोब वेसण घालून लोकशाहीचे रक्षण करावे, अशी मागणी सर्वोदय मंडळ, धुळे जिल्हा हरिजन सेवक संघ व राष्ट्रसेवा दलाने केली.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या सभांमधून भिडे बेताल वक्तव्य करत आहेत. बडनेरा (जि. अमरावती) येथे तर त्यांनी अशा वक्तव्यांबाबत कळसच केला. महात्मा गांधी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले. त्यापूर्वी त्यांनी महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. जवाहरलाल नेहरू, लाखो भक्त असलेल्या साईबाबांवरही भिडे यांनी तोंडसुख घेतले.

भिडे यांच्या अशा बेलगाम वक्तव्यांमुळे समाजात दुफळी निर्माण होऊन समाजस्वास्थ्य दूषित झाले आहे. त्यामुळे सरकारने अशा लोकांना ताबडतोब वेसण घालावे, अशी मागणी या संघटनांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT