Sambhaji Bhide Controversy: सरकारला संभाजी भिडेंचा एवढा पुळका का?

Why is the state Government so concerned about Sambhaji Bhide? - बहुजन समाज पक्षातर्फे संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
Sambhaji Bhide
Sambhaji BhideSarkarnama
Published on
Updated on

Nandurbar Political News : देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी, थोर समाज सुधारक महात्मा फुले यांच्यापेक्षा संभाजी भिडे राज्य सरकारला जास्त जवळचे वाटतात काय? या सरकारला भिडे यांच्याविषयी एवढा पुळका का आहे? असा सवाल बहुजन समाज पक्षाच्या नेत्यांनी केला.

नंदूरबार (Nandurbar) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन समाज पक्षातर्फे (BSP) वादग्रस्त संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्याविरोधात कारवाईसाठी निदर्शने करण्यात आली.

Sambhaji Bhide
CM Eknath Shinde Talk Show: मुख्यमंत्री शिंदे करणार 'मन की बात' ; 'मी मुख्यमंत्री बोलतोय' मधून देणार जनतेच्या प्रश्नांची उत्तरे..

सबंध आठवडाभर वादग्रस्त संभाजी भिडे यांच्या विरोधात उत्तर महाराष्ट्रात आंदोलने होत आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी निदर्शने केली जात आहेत. हे वातावरण शांत होत नाही. त्यामुळे या विषयावर पुरोगामी तसेच विविध राजकीय पक्ष, नागरिकांच्या भावना तीव्र असल्याचे चित्र आहे.

गुरूवारी नंदूरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन समाज पक्षातर्फे निदर्शने करीत भिडे यांचा निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. भिडे यांच्याकडून सातत्याने महापुरुषांचा अपमान केला जात आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भिडेंना अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Sambhaji Bhide
Ulhasnagar Crime News: ननावरे दाम्पत्याच्या घराचे कुलूप तोडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न: दोघेजण सीसीटिव्हीत कैद

जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ब्राह्मणे म्हणाले, भिडे यांनी यापूर्वी महात्मा गांधी तसेच महात्मा जोतिराव फुले व इतर महापुरुषांबद्दल अपशब्द वापरले आहेत. राज्य सरकारचे अभय असल्याने भिडे असे अपशब्द बोलत आहेत. राज्य सरकार राजकीय फायदा करण्यासाठी भिडेंवर कुठलीही कारवाई करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

या वेळी पक्षाचे जिल्हा प्रभारी जितेंद्र तायडे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष अहिरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रमिलाताई जाधव, जिल्हा सचिव विश्वास पवार, बिरजू बैसाणे, सना जावेद शहा, किरण शिरसाठ, दीपक महिरे, सुभाष बिरारे, अनिसा सिकलीकर आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com