जामनेर हत्याकांड – अल्पसंख्यांक युवकाच्या अपहरणानंतर झालेल्या हत्येच्या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून पोलिस तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
गिरीश महाजन यांच्यावर आरोप – समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी थेट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या ड्रायव्हरच्या मुलासह भाजप कार्यकर्त्यांवर हत्येत सहभागाचा आरोप केला.
राजकीय प्रतिक्रिया – काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि समाजवादी पक्षासह अनेक विरोधी नेत्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सरकारवर तपास दडपण्याचा आरोप केला आहे.
Jalgaon News: जामनेर (जळगाव): येथील अल्पसंख्यांक समाजाच्या युवकाचा जमावाकडून अपहरण करून खून करण्यात आल्याची घटना चार दिवसापूर्वी घडली आहे. या प्रकरणात विरोधी पक्षाच्या विविध नेत्यांनी पोलिसांच्या तपासावर गंभीर आरोप केले होते. आता मात्र थेट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली होती. आता समाजवादी पार्टीचे आमदार आझमी यांनीही जामनेर येथे पिडीत कुटुंबाची भेट घेतली.
आझमी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात ओढले आहे. संबंधित युवकाच्या हत्येचा मास्टरमाइंड मंत्री गिरीश महाजन यांच्या ड्रायव्हरचा मुलगा आहे. भाजपच्या काही कार्यकर्त्यांचाही त्यात सहभाग आहे, असा गंभीर आरोप आझमी यांनी केला.
जामनेर हा जलसंपदा मंत्री महाजन यांचा मतदारसंघ आहे. या प्रकरणातील तपासात पोलिसांवर यापूर्वीच गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलीस पीडित कुटुंबीयांना अतिशय वाईट वागणूक देत असल्याचा आरोप यापूर्वी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला होता.
या पार्श्वभूमीवर आमदार आझमी यांनी मंत्री महाजन हे मुख्यमंत्र्यांचे जवळचे आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणात लक्ष घालतील का? पीडित कुटुंबीयांना न्याय देतील का? असे प्रश्न करून मुख्यमंत्र्यांनी यामध्ये पिढी त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आझमी यांनी केली.
गेल्या आठवड्यात झालेल्या 21 वर्षीय युवकाच्या हत्येला आता राजकीय वळण मिळाले आहे. विरोधी पक्षाच्या विविध नेत्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन याबाबत प्रशासन आणि तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. जमावाकडून अतिशय क्रूर पद्धतीने या युवकाची हत्या झाली. त्या दृष्टीने हा तपास आयपीएस अधिकाऱ्यांकडे सोपविण्याची गरज आहे. याबाबत राज्य शासनाने एसआयटीची घोषणा करणे अपेक्षित आहे.
मात्र तसे काहीही घडलेले नाही. त्यामुळे या प्रकरणात राज्य सरकार काही लपविण्याचा प्रयत्न तर करत नाही ना? असा प्रश्न विरोधी पक्षांनी उपस्थित केला होता. आता याबाबत प्रकरणाची धागेदोरे आमदार आझमी यांनी थेट मंत्री गिरीश महाजन यांच्या ड्रायव्हरच्या मुलासह भाजप कार्यकर्त्यांवर आरोप केला आहे. त्यामुळे आझमी यांच्या आरोपांनी या प्रकरणाला पुन्हा एकदा राजकीय फोडणी मिळण्याची चिन्हे आहेत.
पोलीस भरतीच्या ऑनलाईन फॉर्मबाबत माहिती घेण्यासाठी सुलेमान खान हा जामनेरला आला होता.तो एका कॅफेमध्ये एका 17 वर्षीय मुलीसोबत बसला होता.
पोलिस ठाण्याच्या जवळच असलेल्या त्या कॅफेमध्ये 10-15 स्थानिक तरुण आले आणि त्यांनी दोघांना तिथून जबरदस्तीने घेऊन गेले.
सुलेमानला जंगलात नेऊन दीर्घकाळ अमानुष मारहाण करण्यात आली. यात त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह गावात नेऊन त्याच्या घरासमोर टाकण्यात आला.
त्यावेळी त्याची आई, बहीण आणि वडील घराबाहेर आले असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली.
Q1: जामनेर प्रकरणात काय घडले?
👉 अल्पसंख्यांक युवकाचे अपहरण करून त्याचा जमावाकडून खून करण्यात आला.
Q2: गिरीश महाजन यांच्यावर कोणता आरोप झाला आहे?
👉 त्यांच्या ड्रायव्हरच्या मुलासह भाजप कार्यकर्ते या प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचा आरोप करण्यात आला.
Q3: विरोधकांची मागणी काय आहे?
👉 तपास आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपवून एसआयटी स्थापन करण्याची मागणी झाली आहे.
Q4: या प्रकरणाला राजकीय वळण का मिळाले?
👉 कारण विविध विरोधी नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस व गिरीश महाजन यांना थेट या प्रकरणात जबाबदार धरले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.