Devendra Fadnavis News: नगरपालिकांच्या निवडणुकीचा रणसंग्राम मंगळवारी संपला. या निवडणुकीत अपवाद वगळता विरोधी महाविकास आघाडीचे अस्तित्व जाणवले नाही. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे.
नगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांनी युती करायची की स्वतंत्र लढायचे हा निर्णय झाला नव्हता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सूचक मौन बाळगले होते. स्थानिक पातळीवर याबाबत नेत्यांनी निर्णय घेतला.
राज्यभरातील नगरपालिका निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष परस्परांशीच संघर्ष करताना दिसले. विशेषतः विदर्भ वगळता राज्यात भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात चुरस होती. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने भाजपला थेट आव्हान दिले होते.
अत्यंत नियोजनपूर्वक आणि कॅलकुलेटीव्ह पद्धतीने राजकारणाचे डाव टाकण्यात आले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेवटच्या क्षणी स्थानिक नेत्यांना निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला.
बहुतांशी नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाने सत्तेतील सहकारी पक्षांना दूर लोटले. उत्तर महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातच जोरदार हल्ले आणि प्रतिहल्ले झाले. त्यातून भाजपने महापालिका निवडणुकीसाठी काय करायचे याचा संदेश घेतला आहे.
नगरपालिका निवडणुकीची पुनरावृत्ती महापालिका निवडणुकांमध्ये होण्याची शक्यता आहे. नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता संपली आहे. या परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका न्यायालयाच्या निकालाने लांबळीवर पडण्याचे चिन्ह आहेत
त्यामुळे आता सत्ताधारी महायुतीला आणि विशेषता भाजपला महापालिका काबीज करण्याची घाई झाली आहे. भाजपच्या बहुतांशी मंत्र्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात संघटनात्मक स्तरावर तयारी केली आहे. या तयारीमुळे भाजप राज्यभरात सगळीकडे स्वबळावर निवडणुकीला सामोरा जाईल. त्यांचे हे डावपेच नेहमीप्रमाणे महाविकास आघाडीला धक्का देणारे ठरण्याची शक्यता आहे.
महायुतीने विभक्त होऊन निवडणुका केल्या तरीही त्यात भाजपचेच हित आहे. याला नंतरही महायुतीतील घटक पक्ष भाजपच्या विरोधात जाण्याची शक्यता नाही. त्याचा फटका महाविकास आघाडीला बसणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष वगळता अन्य पक्षांचे याबाबत फारसे आक्रमक धोरण नाही. राज्यातील ही राजकीय स्थिती भाजपच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत.
---------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.