Rakhsha Khadse : मुक्ताईनगरमध्ये भाजप उमेदवाराला अडवलं, मग काय.. रक्षा खडसे थेट पोलिसांशी भिडल्या

Muktainagar politics : मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसे व पोलिसांमध्ये वाद झाला. मतदान केंद्रावर भाजपच्या उमेदवाराला अडवल्याच्या कारणातून रक्षा खडसे पोलिसांवर भडकल्या.
Rakhsha Khadse
Rakhsha KhadseSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Politics : राज्यात नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून आज मतदानाचा दिवस होता. मतदानासोबतच आज राज्यातील अनेक मतदान केंद्रावर राडा-वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगरमध्ये भाजपच्या खासदार आणि मंत्री रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. मतदान केंद्रावर भाजपच्या उमेदवाराला अडवल्याच्या कारणातून रक्षा खडसे पोलिसांवर संतापल्या. या प्रकारामुळे शहरात गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं.

Rakhsha Khadse
Girish Mahajan : काय होतास तू, काय झालास तू, अरे येड्या कसा वाया गेलास तू?.. गिरीश महाजनांनी केली खडसेंवर कविता

भाजपच्या उमेदवाराला मतदान केंद्रावर पोलिसांनी अडवल्याच्या कारणातून रक्षा खडसे पोलिसांवर संतापल्या. या दरम्यान काही मिनिटे तीव्र शाब्दिक चकमक झाली. दुसरीकडे, आमदार चंद्रकांत पाटील यांनी बोगस मतदानाचा गंभीर आरोप केला. या आरोपावरून देखील मतदान केंद्राबाहेर राडा झाल्याचे समोर आले.

जुने शहरात मतदान सुरळीत सुरू असताना भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी किंवा कार्यकर्त्यांना नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वाहनांना पोलिसांनी अडवले. रक्षा खडसेंना कुणी तरी लगेच त्यासंदर्भात सांगितले. त्यानंतर रक्षा खडसे तातडीने त्या ठिकाणी गेल्या आणि वाहनांना अडवल्याबाबत पोलिसांना जाब विचारला. त्यातून पोलिस व रक्षा खडसे यांच्यात बाचाबाची झाली.

घटनास्थळी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी मंत्री रक्षा खडसे यांना सांगितले की, ते विशेष बंदोबस्तासाठी पुण्याहून आले आहे. त्यांना स्थानिक पक्षनेते किंवा कार्यकर्ते कोण आहेत याची माहिती नाही. आम्ही केवळ दिलेल्या आदेशांनुसारच काम करत आहोत असे पोलिसांनी रक्षा खडसेंना सांगितले. घटनास्थळी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी मंत्री खडसे यांना सांगितले की, ते विशेष बंदोबस्तासाठी पुण्याहून आले आहे. त्यांना स्थानिक पक्षनेते किंवा कार्यकर्ते कोण आहेत याची माहिती नाही. आम्ही केवळ दिलेल्या आदेशांनुसारच काम करत आहोत असे पोलिसांनी रक्षा खडसेंना सांगितले.

Rakhsha Khadse
Devendra Fadnavis : तपोवनातील जमीन मिळाली नाही तर हा कुंभमेळा होणार कसा? CM फडणवीसांचा महाजनांच्या सुरात सूर

पोलिसांचे स्पष्टीकरण ऐकल्यानंतर रक्षा खडसे यांनी वारंवार होणाऱ्या अडथळ्यांवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, नियम सर्वांना सारखे लागू केले पाहिजेत. सगळ्यांवर एकच नियम लागू करा. आमच्या वाहनांना अडवणार असाल तर इतरांचेही वाहने थांबवा, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com