Apoorva Hiray, Vice President of NCP, is expected to join the BJP, signaling a major political shift ahead of key elections in Maharashtra.  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Apoorva Hiray Politics : अजित पवारांना मोठा धक्का; माजी आमदार अपूर्व हिरेंचा भाजप प्रवेश निश्चित...

Impact on Ajit Pawar and NCP Faction : अपूर्व हिरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचा भाजप प्रवेश दादा भुसे यांच्यासाठीही धक्का मानला जात आहे.

Sampat Devgire

Nashik Politics : गेली दोन वर्ष हिरे कुटुंबीयांच्या शिक्षण संस्था आणि व्यक्तिगत अपूर्व हिरे यांच्या विरोधात मंत्री दादा भुसे यांनी पोलीस आणि शासकीय ससेमीरा लावला होता. त्यातून सुटका करण्यासाठी अखेर हिरे भाजपला शरण जाणार आहेत. या निमित्ताने मालेगाव बाह्य मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी अपेक्षित आहेत.

भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मालेगावमध्ये मोठा धक्का दिला आहे. माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे येत्या बुधवारी भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत. मुंबईत होणाऱ्या या प्रवेश कार्यक्रमासाठी हिरे समर्थक तयारीला लागले आहेत. येत्या एक-दोन दिवसांत मालेगावमध्ये अपूर्व हिरे समर्थकांची बैठक होणार आहे.

शिवसेनेचे नेते व मंत्री दादा भुसे आणि हिरे कुटुंबीय यांच्या गेली 25 वर्ष राजकीय कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. प्रशांत हिरे यांचा पराभव करूनच दादा भुसे विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. त्यानंतर गेल्या पाच विधानसभा निवडणुकांमध्ये हिरे यांना भुसे यांचा पराभव करता आलेला नाही.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री भुसे यांनी हिरे हे संभाव्य विरोधक असल्याने त्यांच्या विरोधात मोठी मोहीम उघडली होती. शैक्षणिक संस्थेच्या चौकशी बरोबरच हिरे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात आणि धर्मादाय आयुक्त यांच्याकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. सर्व तक्रारी मागे मंत्री भुसे यांचा हात असल्याचा जाहीर आरोप हिरे यांनी केला होता.

या राजकीय पार्श्वभूमीवर माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे येत्या दोन जुलैला मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. हा एक प्रकारे महायुती सरकारच्या मुख्य पक्ष सामील होऊन मंत्री भुसे यांना आव्हान देण्याचा प्रकार आहे. या निमित्ताने डॉ. हिरे सत्ताधारी भाजप पक्षात तर त्यांचे लहान बंधू अद्वय हिरे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात असे चित्र एकाच वेळी असेल. त्यामुळे हा एक प्रकारे दादा भुसे यांना राजकीय आव्हान देण्याचा प्रयत्न असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT