Eknath-shinde-devendra-Fadanvis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra Fadnavis Politics: शिवसेना एकनाथ शिंदे, भाजप वाद, दोघांची युती राहणार का तुटणार?, देवा भाऊंनी स्पष्टच सांगितले...

Maharashtra Politics Devendra Fadnavis Mahayuti Eknath Shinde Shiv Sena Alliance Comments of CM-नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजप नेते रवींद्र चव्हाण यांचे ‘ते’ भाजप शिवसेना युतीबाबत विधान चर्चेत

Sampat Devgire

Devendra Fadnavis News: नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात जोरदार संघर्ष झाला. स्थानिक नेत्यांनी भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका केली. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मागे नव्हते.

नगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांनी स्वतंत्र व सोयीनुसार निवडणुका लढवल्या. त्यामुळे त्यांच्यात परस्परांतच संघर्ष झाला. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि भाजपची युती राहणार की तुटणार इथपर्यंत चर्चा सुरू झाली होती. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले.

भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची युती राहणार की तुटणार? अशी चर्चा निवडणुकीदरम्यान सुरू होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावर वक्तव्य केले होते. रवींद्र चव्हाण यांचे वक्तव्य राजकारणात खळबळ उडवून गेले.

एका प्रश्नाच्या उत्तरात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दोन डिसेंबर पर्यंत आम्हाला एकत्र राहायचे आहे, असे म्हटले होते. अनेक राजकीय नेत्यांनी त्यातून भाजप शिवसेना युती तुटणार असा कयास बांधला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यातील संबंध ताणले गेले होते

नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता संपला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-भाजप वादावर प्रतिक्रिया दिली आहे. सकाळ वृत्तपत्राच्या कार्यक्रमात मुंबईत त्यांनी याबाबत आपले स्पष्ट मत मांडले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आमच्यात कोणताही संघर्ष नाही. घरामध्ये देखील दोन भावांचे प्रत्येक गोष्टीत एकमत नसते. आमचे देखील काही गोष्टींमध्ये एक मत नाही. याचा अर्थ फार वेगळा घेण्याची गरज नाही.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझे सर्व बाबतीत एकमत झाले असते, तर आमचे पक्ष वेगळे नसते. आमच्यात काही मतमतांतरे आहेत. पण व्यापक राजकारणात आम्ही एकत्र आहोत. एकत्रच राहणार आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे नगरपालिका निवडणूक संपल्यानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद हादेखील पेल्यातील वादळ ठरले आहे. भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातील वादावर राजकीय कयास बांधणाऱ्यांचा त्यातून हिरमोड झाला, असेच म्हणता येईल.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT