Sujay Vikhe Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sujay Vikhe Patil : 'दहावा असेल तर सांगा कावळ्याच्या आधी पोहोचतो ', सुजय विखे असे का म्हणाले?

Sujay Vikhe Patil lok sabha election defeated : लोकसभेत पराभव झाल्यानंतर सुजय विखे यांनी गाठीभेटींचा धडाका लावला आहे. शिर्डी मतदारसंघात ते चांगलेच सक्रिय झालेले दिसत आहेत.

Roshan More

Sujay Vikhe Patil : लोकसभेला पराभूत झाल्यानंतर माजी खासदार सुजय विखे पाटील पुन्हा सक्रिय झाले आहेत. ठिकठिकाणी ते कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. एका पतसंस्थेच्या कार्यक्रमाला आलेल्या सुजय विखे पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली.

'आता मोकळाच आहे, मी ठरवलंय की एखादं उद्घाटन असेल, वाढदिवस असेल किंवा जागरण-गोंधळ, हजर राहायचे. दहावा असेल तर लगेच सांगा, कावळ्याच्या आगोदर सुजय विखे हजर राहील.' असे सुजय विखे पाटील म्हणाले.

लोकसभेत पराभव झाल्यानंतर सुजय विखे Sujay Vikhe Patil यांनी गाठीभेटींचा धडाका लावला आहे. शिर्डी मतदारसंघात ते चांगलेच सक्रिय झालेले दिसत आहेत. लोकसभेच्या पराभवानंतर मी खूप काही शिकलो, अशी मिश्किल टिपण्णी देखील सुजय यांनी केली.

लोकसभा निवडणुकीत Loksabha Election सुजय विखे पाटील विरुद्ध नीलेश लंके लढतही महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरली होती. अजित पवार गटातून शरद पवार गटात आलेल्या नीलेश लंके यांनी सुजय विखे यांच्या पुढे आव्हान उभे केले होते. तरी सुजय विखे हे कमी फरकाने विजय मिळवतील, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, सर्व अंदाज फोल ठरवत 29 हजार मतांनी पराभव केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT