Aamshya Padavi  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Politics : सत्ताधारी आमदाराचा सरकारला 'घरचा आहेर'; आमश्या पाडवी का म्हणाले, 'हे आमचे दुर्दैव'?

Amshya Padavvi statement on government controversy : सत्ताधारी आमदार आमश्या पाडवी यांनी स्वतःच्या सरकारवरच टीका करत परिस्थितीला दुर्दैवी म्हटले. त्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

Sampat Devgire

Amshya Padvi News : राज्यपालांच्या अभिभाषणावर विविध आमदारांनी भाष्य केले. यानिमित्ताने प्रश्न मांडण्याची संधीही त्यांनी घेतली. मात्र यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या काही आमदारांनी चक्क सरकारचे कान टोचले. नंदुरबार हा आदिवासी आणि दुर्गम जिल्हा आहे. राज्याच्या शेवटच्या ंकोपऱ्यात आणि गुजरातच्या सीमेवरील या जिल्ह्यात अनेक समस्या आहेत. आदिवासी बहुल भाग असल्याने येथील समस्या सोडविण्यात प्रशासन उदासीन असल्याचा तक्रारी आहेत.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार आमश्या पाडवी यांनी याबाबत सरकारला घरचा आहेर दिला. नंदुरबार जिल्ह्यातील आपल्या मतदारसंघाकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. विकासासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून एकनाथ शिंदे पक्षात ते गेले आहेत, हे विशेष. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना आमच्या पाडवी यांनी राज्यपालांचे अभिनंदन केले. त्याचवेळी त्यांनी आपले दुःख देखील सांगितले. त्यामुळे आपल्या भावना संमिश्र असल्याचे आमदार पाडवी म्हणाले.

आमदार पाडवी यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विधान परिषदेवर नियुक्त केले होते. त्या काळात त्यांनी आपल्या मतदारसंघाचे आणि जिल्ह्याचे प्रश्न विधिमंडळात मांडले. अजूनही ते काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मी ज्या मतदारसंघातून निवडून आलो आहे तेथील प्रश्न अतिशय गंभीर आहेत. माझ्या मतदारसंघात सरकारने लक्ष घातले पाहिजे. मला हे वारंवार सांगावे लागते आहे. चार वर्षे ही हेच करावे लागेल का? असा प्रश्न त्यांनी केला.

आपल्या नवापूर मतदारसंघात पाणी, वीज, रस्ते, आरोग्य या सर्व समस्या तीव्र आहेत. मतदारसंघातील 60 टक्के गावांमध्ये रस्ते नाहीत, हे दुर्दैव आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. मतदार संघातील ४०० गावांमध्ये वीज नाही. साठी टक्के गावे रस्त्यांना जोडलेली नाहीत. मग विकास या आदिवासी भागाला केव्हा दिसेल? माझ्या आमदारकीची उर्वरित चार वर्षे मला हेच काम करावे लागणार आहे का? हे सांगताना माझे दुःख सरकारने लक्षात घ्यावे, असे आमदार पाडवी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT